Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

नंदुरबार nandurbar। प्रतिनिधी

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) संवेदनहिन (senseless) असुन शेतकर्‍यांच्या (farmers) प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले असतांना अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल, अशा घोषणा राज्यभर मंत्री करत फिरले मात्र सरकारने शेतकर्‍यांना मदतीची घोषणा न करता पूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचं चित्र आहे. सरकार फक्त आश्वासनाचा पलीकडे काही करत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil)यांनी केली.

- Advertisement -

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौर्‍यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे ध्येय नजरेसमोर त्यांनी ठेवले आहे.

आज नंदुरबार व शहादा येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले. गावागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची गरज आहे.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल असा दृढ विश्वासही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. .

सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकोपयोगी काम करूया असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. दौर्‍याची सुरुवात नंदुरबार जिल्हयातील शहादा विधानसभा मतदारसंघातून झाली.

शहादा येथे घेतलेल्या या आढावा बैठकीला ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी आ.उदयसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, शहादा-तळोदा विद्यार्थी अध्यक्ष कुणाल पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या