Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याOBC reservation : शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..

OBC reservation : शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..

मुंबई | Mumbai

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२७ व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भातील विधेयक मांडून मंजूर करण्यात आले. त्यानुसार आता आरक्षणाची (Reservation) सूची तयार करण्याचा अधिकार हा राज्य सरकारांना देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) घणाघात केला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्याने आता राज्यांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला असं अनेकांना वाटलं. खरंतर याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे, असं सांगतानाच जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधला, असा हा प्रकार असून केंद्राने ओबीसींची शुद्ध फसवणूक केलीय, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. यासोबतच ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटलं, केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला आहे. परिणामी आरक्षणासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असं लोकांचा गैरसमज झाला असेल तर ही ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. हे म्हणजे ताटभर अन्न वाढून हात बांधल्याचा प्रकार असल्याचं त्यांनी नमूद केले आहे. देशात ९०% राज्यांनी ५०% आरक्षणाची मर्यादा आधीच ओलांडल्याचं सांगत राज्य निहाय आरक्षण टक्केवारी वाचून दाखवली आहे. यामध्ये महाराष्ट्रात आरक्षण ६५% वर आहे.

दरम्यान केंद्र सरकारकडून घटना दुरुस्ती करून १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. राज्यांना ओबीसींची यादी बनवून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं केंद्राने सांगत घटनादुरुस्ती केली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असं शरद पवारांनी ठकावून सांगितले आहे. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना केंद्राने जातीनिहाय जनगणना करावी, इम्पिरिकल डेटा राज्यांना द्यावा आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेची अट काढून टाकावी अशा तीन प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे केल्या आहेत.

राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावं

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एका कार्यक्रमात मांडले होते. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पत्रकारांनी शरद पवारांना पत्र विचारला असता. पवार म्हणाले मला त्याविषयी काही बोलायचं नाही. परंतु राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे. बाकी यावर शरद पवार यांनी काहीही भाष्य केले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या