Monday, July 15, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

- Advertisement -

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी (State President of the Nationalist Women’s Congress) माजी आमदार विद्या चव्हाण (Former MLA Vidya Chavhan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान (MP Faujia Khan) यांनी गुरुवारी चव्हाण यांच्या निवडीची घोषणा केली.

महिला आघाडीच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड करताना पक्षाने प्रथमच विभागवार अध्यक्ष नेमले आहेत. त्यानुसार नागपूर विभागासाठी शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावतीसाठी वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाड्यासाठी शाजिया शेख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्रासाठी कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकणसाठी अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभागासाठी ऋता आव्हाड (ठाणे) तर उत्तर महाराष्ट्रसाठी कविता परदेशी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती फौजिया खान यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या