पिंपरी चिंचवड | Pimpri chinchwad
सध्या महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानिमित्ताने अजित पवार प्रचारासाठी फिरत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी रविवारी केलेल्या जाहीर भाषणात केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले असतानाच एका रंजक प्रसंग घडला…. “अजितदादा, वी लव्ह यू!” अशी साद एका कार्यकर्त्याने घालताच सभेत हशा पिकला…. यावर दादांनी आपल्या खास शैलीत मिश्किल ‘दम’ भरला…. प्रशासनाचे कान टोचतानाच दादांच्या या मिश्किल स्वभावाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
K Annamalai: मला धमकी देणारे आदित्य, राज ठाकरे कोण?; राज ठाकरेंच्या टीकेला अण्णामलाईचं प्रत्युत्तर
कार्यकर्त्याकडे बघून अजित पवार म्हणाले, “हां, घड्याळाचं बटण दाब. ते लव्ह यू राहू दे बाजूला.. घरी जाऊन बायकोला म्हण लव्ह यू लव्ह यू लव्ह यू.. बायको म्हणेल आज लैच बिघडलाय गडी” आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला!




