दिल्ली | Delhi
या वर्षाची सर्वात पहिली Netflix Originals वर रिलीज झालेली वेबसीरिज म्हणजे ‘बॉम्बे बेगम्स’. ८ मार्च म्हणजेच महिला दिनाचं औचित्य साधून ही सिरिज रिलीज केली गेली.
मात्र ‘बॉम्बे बेगम्स’ ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने या सीरीजचं स्ट्रिमिंग थांबवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या सीरीजमधल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. गुरुवारी या आयोगाने एक नोटीस जारी केली आहे.
आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर प्रदर्शित
काय म्हटलंय नोटिसमध्ये ?
सीरीजच्या निर्मात्यांना आपला तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. २४ तासात अहवाल सादर केला नाही तर कारवाई करण्यात येईल अस या नोटीसीमध्ये म्हटलं आहे. या सीरीजमध्ये लहान मुलांशी संबंधित काही दृश्ये अशी आहेत की, ज्याने मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतील. लहान मुलांना या सीरीजमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. याचा परिणाम लहान मुलांवर होऊ शकतो असं या आयोगाचं म्हणणं आहे.
तसेच ‘नेटफ्लिक्सने अल्पवयीन मुले आणि त्यांच्याबद्दलचा कोणताही आशय प्रदर्शित करताना जास्त काळजी घ्यायला हवी. याबद्दल योग्य ती कृती लवकरात लवकर करण्यात यावी आणि या वेबसीरीजचं स्ट्रिमिंग लवकरात लवकर थांबवण्यात यावं. बालहक्क संरक्षण कायद्याच्या कलम १४ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं आयोगाने या नोटिसमध्ये म्हटलं आहे.
‘या’ तारखेला प्रदर्शित होणार नागराज मंजुळे आणि अमिताभ यांचा ‘झुंड’
८ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर सुरू करण्यात आलेल्या सहा भागातील वेब सिरीज बॉम्बे बेगम्स, मुंबईतील ५ महिलांवर आधारित आहे, लिप्स्टिक अंडर माय बुरखाच्या चित्रपट निर्मात्या अलंक्रिता श्रीवास्तव यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. या शोमध्ये महत्वाकांक्षी, आपले काम व वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्या आयुष्यातील पुरूष, त्यांच्या मुले यांच्याबरोबर असेले त्यांचे नाते व त्यांचे स्वत:च्या शरीराशी असलेले नाते यावर प्रकाश टाकला आहे. यामध्ये अमृता सुभाष, प्लाबिता बोर्थाकुर, आद्य आनंद, राहुल बोस, विवेक गोम्बर आणि डॅनिश हुसेन पूजा भट्ट, शहाना गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.