दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :
केंद्राच्या कृषी विधेयकाच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे माजी जिल्हा अध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली पायी दोंडाईचा ते शिंदखेडा असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आक्रोश मोर्चाला दोंडाईचा येथील राष्ट्रवादी कार्यालयापासून सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आक्रोश मोर्चा शिंदखेड्याच्या दिशेने निघाला.
कृषी विधेयकाच्या निणर्याच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून गेला.
मोर्चात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष संदीप बेडसे, माजी आ. रामकृष्ण पाटील, तालुका अध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शहर अध्यक्ष एकनाथ भावसार, माजी तालुका अध्यक्ष विठ्ठलसिंग आण्णा, ओबीसी सेलचे बापू महाजन, युवक जिल्हा अध्यक्ष मयुर बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश पाटील, तालुका अध्यक्ष चिराग माळी, ओबीसी सेलचे जिल्हा संघटक ईश्वर माळी, कय्युम पठाण, राजू देशमुख, अमृत पाटील, गुलाबराव पाटील, बापुजी मिस्तरी, कमलाकर बागले, दीपक जगताप, निखील पाटील, सागर पवार, चेतन देसले, प्रविण पाटील, कमलेश पाटील, प्रकाश तात्या, आबा महाजन छोटू सैंदाणे, मुस्ताक शाह, दादाभाई कापुरे, भोला कापुरे, रईस बागवान, बिलाल बागवान, विकास मास्तर, परेश पाटील, भटू पाटील, महेश पाटील, श्याम पाटील, रवी बापू, भगवान भिल, पं.स. सदस्य, राम ठाकरे, राहुल कोळी, निलेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा शिंदखेडा तहसील कार्यालयावर धडकला. तेथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.