Monday, October 14, 2024
Homeमुख्य बातम्याNCP : राष्ट्रवादीचा नगर येथील ९ जूनचा मेळावा पुढे ढकलला, कारण काय?

NCP : राष्ट्रवादीचा नगर येथील ९ जूनचा मेळावा पुढे ढकलला, कारण काय?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन येत्या १० जूनला आहे. यानिमित्ताने नऊ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

यावेळी पक्षाचं मोठं शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात येणार होत. मात्र, नगर शहरातील ९ जूनचा होणारा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताला सांगितले की,​ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दि. ९ जून २०२३ रोजी, केडगाव, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे.

या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, मेळावा रद्द करण्यात आला नसून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुढील तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. अर्थात लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे नगरच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या