Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशदक्षिणेतील 'या' राज्यात एनडीएचा ऐतिहासिक विजय; डाव्यांच्या ४५ वर्षांच्या सत्तेला दिला हादरा

दक्षिणेतील ‘या’ राज्यात एनडीएचा ऐतिहासिक विजय; डाव्यांच्या ४५ वर्षांच्या सत्तेला दिला हादरा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दक्षिणेतील केरळ राज्यात विस्तार करण्यासाठी गेल्या काही काळापासून भाजपचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपूरममध्ये मोठा विजय मिळवला आहे. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली असून तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील डाव्या पक्षांची ४५ वर्षांपासूनच्या सत्तेला हादरा दिला आहे.

तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ पैकी ५० वॉर्डमध्ये एनडीएने विजय मिळवला, तर सत्ताधारी एलडीएफला केवळ २९ जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) १९ जागा जिंकण्यात यश आले. दोन ठिकाणी अपक्षांचा विजय झाला. तसेच एका वॉर्डमध्ये गेल्या आठवड्यात उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे त्या वॉर्डमधील निवडणूक रद्द करण्यात आली होती.

- Advertisement -

तिरुवनंतपुरमन महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या पक्षांची सत्ता आहे. तर तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे सातत्याने निवडून येत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या भागात आपला प्रभाव वाढवत असलेल्या भाजपाने येथील डावे पक्ष आणि काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढत हे ऐतिहासिक यश मिळवले आहे.

YouTube video player

मोदींनी केरळवासीयांचे मानले आभार
भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरून प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की,’धन्यवाद तिरुवनंतपुरम!’ तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळालेला जनादेश हे केरळच्या राजकारणाला मिळालेलं एक ऐतिहासिक वळण आहे. राज्याच्या विकासाच्या आकांक्षा केवळ भाजपाद्वारेच पूर्ण होऊ शकतात, याची जाणीव जनतेला झाली आहे. आमचा पक्ष या ऊर्जामय शहराच्या वाढीसाठी आणि येथील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी वाढवण्यासाठी काम करेल’, असे आश्वासनही नरेंद्र मोदी यांनी दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जानेवारी २०२६ – नवा वाचनतोडगा

0
वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे तिची आठवण पुन्हा...