Sunday, October 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNDA आजच सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता; मोदींच्या शपथविधीची तारीखही ठरली?

NDA आजच सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता; मोदींच्या शपथविधीची तारीखही ठरली?

नवी दिल्ली | New Delhi

देशातील लोकसभेच्या (Loksabha) ५४३ जागांचा निकाल काल जाहीर झाला आहे. या निकालात भाजपप्रणित एनडीएला (NDA) २९४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यातच आज दुपारी मोदींनी राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांनी १७ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.

- Advertisement -

याशिवाय आजच एनडीए कडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच आता सत्ता स्थापनेसह लोकसभा भंग करण्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १७ वी लोकसभा भंग केली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी एनडीएला समर्थनाचे पत्र दिले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही आपल्या पक्षांच्या समर्थनाचे पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सध्या एनडीएच्या नेत्यांची बैठक सुरु असून ही बैठक संपल्यानंतर मोदींसह, अमित शहा, जेपी नड्डा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तसेच येत्या ८ जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या