Sunday, November 24, 2024
Homeदेश विदेशबिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणुका लढवल्या जातील : अमित शाह

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणुका लढवल्या जातील : अमित शाह

वैशाली :

यंदाच्या अखेरीस होणारया बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमधील पुढील विधानसभा निवडणूकीची घोषणा करून मला सर्व अफवांना थांबवायचे आहे. भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर आता सर्व शक्यता ठप्प झाल्या आहेत आणि असे मानले जात होते की, भाजपा नितीशकुमार यांना वगळून निवडणूक लढवण्याचा विचार करीत आहे.

- Advertisement -

या मेळाव्याला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल राहुल गांधी आणि लालू प्रसाद यांनी लोकांना दिशाभूल करणे थांबवावे आणि या कायद्यामुळे कोणतेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. विरोधी पक्षांनी सीएएविरोधी दंगली केल्याचा आरोप शाह यांनी यावेळी केला, त्यामुळे लोकांना त्यांच्या खोटा हेतू सांगण्यासाठी भाजपला देशभरात मोर्चा काढावा लागला. केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणाले की, सीएएचा उद्देश ज्यांच्या डोळ्यासमोर बलात्कार केला गेला, त्यांची मालमत्ता हिसकावून घेतली आणि त्यांच्या धर्मस्थळांची विटंबना केली आणि त्यानंतर ते भारतात आले.

काही वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये ज्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या त्यांना नरेंद्र मोदींनी तुरूंगात पाठवलं पण केजरीवाल यांनी त्यांच्यावर खटला सुरू करण्यास नकार दिला, असा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या