मुंबई | Mumbai
इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने कॉल करून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली. हा व्यक्ती नागपूर येथील प्रशांत कोरटकर असल्याचेही त्यांनी सांगितले. जी रेकॉर्डिंग सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, त्यात धमकी देणारा व्यक्ती अर्वाच्य शिवीगाळ करत घरी येऊन मारण्याची धमकी देत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रशांत कोरटकरच्या मनात अत्यंत वाईट भावना आहेत. शिवीगाळ, जीवे मारण्याच्या मला वारंवार देण्यात येतात. पण, कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे. कोरटकरवर सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली आहे. तर दुसरीकडे नागपूर येथील प्रशांत कोरटकरच याप्रकरणी समोर आले. त्यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचे प्रकरण राज्याच्या गृहखात्याने गांभीर्याने घेतले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरुन चर्चा केली आहे. इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात कारवाईला वेग येणार आहे. प्रशांत कोरटकर यांनी त्यांनी फोन केल्याचे नाकारल्यामुळे इंद्रजित सावंत यांना फोन करुन धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
इंद्रजित सावंत काय म्हणाले?
इंद्रजित सावंत म्हणाले, “ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास दिला. त्याच प्रवृत्तीकडून ट्रोल करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या वारंवार दिल्या जातात. मला शिवीगाळ करण्यात आली. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कोरटकरच्या मनात वाईट भावना आहेत.”
इंद्रजीत सावंत म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक वर्ष अनेक जातीच्या समूहांच्या व्यक्तींचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे. पण कधीच कुणी जातीचा गंड दाखवून विधान केले नव्हते. ज्या पद्धतीने उन्माद चढलेला दिसत आहे, तो सर्वत्र आहे. सरकारी अधिकारी बोलत नाही, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सांगू शकतो. एखाद्या जातीचे राज्य आले असे काही लोकांना वाटत आहे. हे महाराष्ट्रात याच्या अगोदर कधी घडलेले नव्हते.
दरम्यान पत्रकाराने विचारलं की, प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली नाही, असे सांगितलेय. यावर तुमचे काय मत आहे. त्यावर इंद्रजीत सावंत म्हणाले की, माझ्याकडे ट्रू कॉलवर जो नंबर आलाय. मला जो फोन कॉल आला त्यावर त्या व्यक्तीने तिचे नाव सांगितले आहे. त्याचा पेक्षा जास्त काय पुरावा असू शकतो. एवढेच नाही तर माझ्या नावावर आणि फोटो टाकून त्याने सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. आता चोराच्या उलट्या बोंबा यावर कोण काय करणार, मला त्या प्रशांत कोरटकरबद्दल काही बोलायचे नाही.
कोरटकरवर सरकारने कारवाई केली पाहिजे. कोरटकर विशिष्ट समाज, पक्ष, नेते आणि पोलिसांच्या जवळचा असल्याचे दिसते. कोरटकरबद्दल शासन वेगळी भूमिका घेणार असेल, तर हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही. हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा झालेला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.
प्रशांत कोरटकर काय म्हणाले?
“मला सकाळी कॉल आले की, माझ्या आवाजात कुणीतरी सावंत यांना धमकी दिली आहे. पहिली गोष्ट तर २५ वर्षांपासून पत्रकारिता करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असो, इतिहास असो याचा मी अभ्यास केलेला आहे. यापूर्वी इतकी जबाबदार पत्रकारिता केल्यानंतर असे मी कुणाला फोनवर धमकी देईल?”, असे प्रशांत कोरटकर म्हणाले.
“माझे नाव वापरून कुणीतरी फोन केला. अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच नाहीये. बाष्कळ धमकी देण्याचा माझा पायंडा नाही. त्यांनी ती गोष्ट माझ्याशी शहानिशा करून टाकली असती, तर बरे झाले असते. तुम्हाला माहितीये की हल्ली एआय करून आवाजाचे मॉर्फिंग केले जाते. माझ्याबद्दल द्वेष बाळगणाऱ्याने हा केलेला प्रकार आहे. मी पोलिसांत तक्रार दिली आहे की, कोणी माझ्या आवाजाची नक्कल केली आहे”, असे प्रशांत कोरटकर यांनी सांगितले. इ