Wednesday, May 22, 2024
Homeधुळेजिल्हा रुग्णालयावरच उपचाराची गरज

जिल्हा रुग्णालयावरच उपचाराची गरज

धुळे Dhule। प्रतिनिधी

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील (Hire Medical College) जिल्हा रुग्णालय (District Hospital) अनेक समस्यांच्या (problems) विळख्यात आहे. सोनोग्राफी, सिटीस्कॅन, यंत्रांच्या कमतरतेसह चहुबाजुला पसरलेली अस्वच्छता, काही डॉक्टर्स व कर्मचार्‍यांमधे (Doctors and staff) वाढलेला उर्मटपणा, तत्काळ सेवा देण्यात होणारे दुर्लक्ष यासह अनेक कारणांमुळे रुग्णांचे नाहक जीव जात (lives of patients are dying) आहेत. त्यामुळे आता रुग्णांवर उपचार करणार्‍या या रुग्णालयावरच उपचार (Need for treatment) करण्याची गरज असल्याचे पत्रक शिवसेना सहसंपर्कप्रमुख (Shiv Sena Joint Liaison Chief) हिलाल माळी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

- Advertisement -

पत्रकात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात दोन तालुके आदिवासी आहेत. तसेच बाजूचा नंदूरबार जिल्हा पूर्णपणे आदिवासी असुन या शहरातून मुंबई आग्रा, सुरत-नागपुर असे राष्ट्रीय महामार्ग जातात. या महामार्गावर अनेक अपघात होतात. अगदी मध्यप्रदेशाच्या हद्दीवर असलेल्या गावांपासून ते कसमादे पट्टा आणि नवापूर पर्यंतचे रुग्ण धुळ्यात येतात. गंभीर रुग्णांची संख्याही मोठी असते.

यामुळे या रूग्णालयावर जास्तीचा ताण असल्यामुळे रूग्णालयात डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी ही सर्व पदे रूग्णालयाचा ताण बघता कमी असुन परिणामी रुग्णांवर योग्यवेळी उपचार केले जात नाहीत. त्यामुळे प्रसंगी रूग्णाचा जीवही जातो, नातेवाईक हतबल होतात. यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जावा. अनेकवेळा डॉक्टर्स आणि नातेवाईकांमध्ये खटके उडतात, त्यामुळे अनर्थ घडल्याची दाट शक्यता असते. यापूर्वी देखील असे प्रकार झालेले आहेत.

असाच एक प्रकार परवा रात्री तीन वाजता घडला. साक्री तालुक्यातील तेजश्री लोटन अहिरे ही गरोदर महिला रूग्णालयात भरती झाली. मात्र तिने विनंती करुनही तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. म्हणून ती दगावली. विशेष म्हणजे घटना लपविण्यासाठी खोटे सांगून आणि ती जीवंत असल्याचे भासवून अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. मात्र सकाळी घटना उघडकीस आली.

नातेवाईक जमा झाले. त्यांनी आम्हाला फोन करुन घटनेबद्दल कळविले असता आम्ही जिल्हा रूग्णालयात पोहचल्यावर संपूर्ण घटणाक्रम हिरे मेडीकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.अरूण मोरे व जिल्हा रूग्णालय अधिक्षक डॉ.मुकर्रम खान यांच्याकडे तक्रार केली. सदर महिलेला उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी योग्य वेळी उपचार केले नाहीत म्हणून ती दगावली. म्हणून सदर दिवशी उपस्थित असलेल्या डॉक्टरांवर चौकशी करून कारवाई करावी अशी नातेवाईकांनी लेखी तक्रार दिली आहे.

या घटनेमुळे रूग्णालयातील अनेक समस्या त्याठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर आम्हाला दिसून आल्या. खरे तर समस्यांनी व्यापलेल्या या रुग्णालयावर योग्यवेळी उपचार करण्याची गरज आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री.माळी यांनी या पत्रकात दिला आहे.

अशा आहेत मागण्या

रुग्णालय परिसरातील साफसफाई व्हावी

सोनाग्राफी, सीटीस्कॅन यंत्राची उपलब्धी व्हावी

इमर्जन्सीसाठी डॉक्टर उपस्थितीची सक्ती व्हावी

आपरेशनची सुविधा वेळेवर, तत्काळ मिळावी

सर्जीकल, आर्थो विभाग सक्षम करावेत

वर्तुणुकीबाबत सूचना, नव्हे प्रंशिक्षण द्यावे

- Advertisment -

ताज्या बातम्या