मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला (Thackeray Group) ‘जय महाराष्ट्र’ करत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे पक्षातील स्थान वाढल्यामुळे शिंदे गटात (Shinde Group) गेल्याचे बोलले जात आहे. अशातच आता नीलम गोऱ्हे यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करत उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
…अन् कोथिंबीरला जागेवरच मिळाला एकरी दोन लाखांचा भाव
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ज्या वेळेला तुम्हाला कुठे जायचं नाही आहे, तुम्हाला ते करण्याची मानसिक शक्ती नाही आहे, तुम्हाला असे वाटते की तुम्ही नाही जायचं असा विचार करून तुम्ही स्वत:ला अडवता आहात. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे तुम्ही अत्यंत असमाधानी आहात. तुम्ही एकीकडे क्लास सिलिंग तोडायचे म्हणता, तु्म्ही उपसभापती करता मात्र तुम्हाला नेता करावे असे कधी वाटले नाही. ठीक आहे तुम्ही मला नेता नाही करत, पण ५७ वर्षांत एकही महिलेला नेता का केले नाही. आता यावर मला असे विचारले जाईल की तुम्ही अनेकवेळा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) बोललात. ठीक आहे, मी मान्य करते. मी अनेकवेळा शिवाजी पार्कवर बोलले. मला आशीर्वाद मिळाले, मला खूप वेळा पक्षाने बोलायला दिले. मी प्रवक्ता होते. मला मोकळं रान होतं बोलायला. २००७ ते २०१८ पर्यंत मी प्रवक्ता म्हणून बोलत होते. परंतु महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळेला तुम्ही कन्सल्ट व्हालच असं नाही असे गोऱ्हे यांनी सांगितले.
Nashik Crime News : उद्योजकाची अडीच कोटींची फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुढे त्या म्हणाल्या की, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मला खूप मदत केली आहे. त्यांनी मला अडचणींच्या काळातही मदत केली आहे आणि माझ्या आमदारकीच्या (MLA) वेळीही मदत केली आहे. हा एक भाग झाला तसेच त्यांचं लिखाण हे देखील खूप उत्तम आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण ते जे काही बोलतात त्यावेळी त्यांना जे सांगितलं जातं तेच संजय राऊत बोलतात. ज्यांना आक्रमक बोलायचे नाही पण आक्रमक बोलणारा माणूस पाहिजे असे म्हणून ती संजय राऊत यांच्याकडे भूमिका आली. त्यामुळे संजय राऊत यांना खूप त्रास झाला. या सगळ्यात संजय राऊत यांचा काही प्रमाणात बळी गेला असे मला वाटते असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
Saptashrungi Bus Accident : पालकमंत्री दादा भुसेंनी केली जखमींची विचारपूस; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना
तसेच संजय राऊत यांचा बळी कसा गेला? असे विचारले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “संजय राऊत यांना अटक झाली होती. त्यांना धमक्या येत आहेत, त्रास होतो आहे. एवढं आक्रमक ते का बोलतात ते काही समजायला मार्ग नाही. पण एकमेकांना नावं द्यायची, वैचारिक न बोलता आक्रमक बोलायचं याला काही अर्थ नाही. नाट्यमय सगळं केल्याने तेढ वाढतो” असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
Saptashrungi Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार