मुंबई | Mumbai
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू (Olympic champion javelin thrower) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली.
लुसान डायमंड लीग स्पर्धेत शुक्रवारी ८९.०८ मीटर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला. या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. नीरज चोप्रा लुसान डायमंड लीग २०२२ (Diamond League 2022) जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना नीरजच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती.
अलीकडेच, नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्जनंतर (२००३) हे पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला. अंतिम फेरीत नीरजने ८८.१३ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकले.