Friday, November 15, 2024
Homeक्रीडाNeeraj Chopra : फक्त एक सेंटीमीटरची चूक, नीरज चोप्राचं स्वप्न भंगल… Diamond...

Neeraj Chopra : फक्त एक सेंटीमीटरची चूक, नीरज चोप्राचं स्वप्न भंगल… Diamond League स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मानावे लागले समाधान

दिल्ली | Delhi

भारताचा स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांचं डायमंड लीग (diamond league crown) विजेतेपद अवघ्या एका सेंटीमीटरने हुकलं आहे. ग्रेनेडाचा खेळाडूने नीरजसमोर बाजी मारली.

- Advertisement -

अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर थ्रो केला. अँडरसनने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. जिथे भारताच्या नीरजने रौप्यपदक जिंकले होते. पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभागी झाला नव्हता.

हे ही वाचा : उमेदवारीची ‘माळ’ की हाती ‘टाळ’ याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष

डायमंड लीगच्या अंतिम फेरीत एकूण ७ भालाफेकपटू सहभागी झाले होते. नीरज चोप्राने अंतिम फेरीत ८६.८२ मीटरचा पहिला थ्रो केला. यानंतर त्याने ८३.४९ मीटरचा दुसरा थ्रो केला. तिसऱ्या थ्रोमध्ये नीरजने पुनरागमन केले आणि त्याने ८७.८६ मीटरचा तिसरा थ्रो केला. या थ्रोमुळे नीरज दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकला. यानंतर त्याचे दोन थ्रो ८५ मीटरपेक्षा कमी होते. नीरजने ८६.४६ मीटरचा शेवटचा थ्रो केला.

नीरज चोप्रा हा गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीशी झगडत आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला डॉक्टरांकडून उपचार घेण्याची आवश्यकता आहे. टोकियो ऑलिंपिक चॅम्पियनने गेल्या महिन्यात डायमंड लीगच्या लुसाने टप्प्यात ८९.४९ मीटरचा प्रयत्न केला होता, जो त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम आणि पंधरवड्यापूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या रौप्यपदक विजेत्या प्रयत्नापेक्षा चार सेंटीमीटर जास्त होता.

हे ही वाचा : धक्कादायक! Youtube वर पाहून ऑपरेशन केलं, मुलाने गमावला जीव… ‘मुन्नाभाई डॉक्टर’ला अटक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या