Wednesday, April 22, 2026
Homeक्रीडाNeeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; पॅरिस...

Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; पॅरिस डायमंड लीगवर कोरलं नाव

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचा गोल्डन बॉय म्हणून प्रसिध्द असलेला भालाफेकपटू व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरजने पॅरिस डायमंड लीग २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. ८८.१६ मीटर भालाफेक करत नीरज चोप्राने या वर्षीच्‍या पहिल्या विजेतेपद पॅरिस डायमंड लीगवर आपल्‍या नावाची मोहोर उमटवली. त्‍याने पहिल्‍या थ्रोच्‍या आधारे जेतेपद निश्‍चित केले. त्याने अँडरसन पीटर्स व जूलियन वेबरसारख्या तगड्या खेळाडूंना पराभूत करत पॅरिस डायमंड लीगच्या विजेतेपदास गवसणी घातली आहे.

नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नातच एक शानदार भालाफेकला ज्यात ८८.१६ मीटर अंतरावर भालाफेक करून विजेतेपद निश्चित केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.१० मीटर अंतरावर भालाफेक केला. त्यानंतर, त्याने पुढील तीन थ्रो फाउल केले. शेवटच्या प्रयत्नात नीरजने ८२.८९ मीटर अंतर कापले. पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा हा पहिलाच विजय आहे.

- Advertisement -

ज्युलीअन वेबर दुसऱ्या स्थानी
ज्युलियन वेबरनेही पहिल्या प्रयत्नात ८७.८८ मीटरचा प्रभावी फेक मारला पण तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या विजयासह नीरजने जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू जूलियन वेबरचा वचपा काढला आहे.

पराभवाचा वचपा काढला
१६ मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये वेबरने नीरज चोप्राला पराभूत केले होते ज्यामध्ये चोप्राने ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक केली. वेबरने ९१.०६ मीटरच्या शेवटच्या फेकसह पहिले स्थान पटकावले. चोप्राने ९०.२३ मीटरच्या फेकसह दुसरे स्थान पटकावले. ३१ वर्षीय वेबरने २३ मे रोजी पोलंडमध्ये झालेल्या जानूझ कुसोसिंकी मेमोरियल स्पर्धेतही चोप्राला हरवले. वेबरने ८६.१२ मीटर आणि चोप्राने ८४.१४ मीटर फेकले. पीटर्सने दोन्हीमध्ये तिसरे स्थान पटकावले.

ब्राझीलचा लुईझ मॉरिसियो दा सिल्वाने ८६.२० मीटर थ्रो करून टॉप-३ मध्ये प्रवेश केल्याने वॉलकॉटची तिसऱ्या स्थानावरील पकड संपली. पॅरिस डायमंड लीगनंतर, चोप्रा २४ जूनपासून चेक प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा येथे होणाऱ्या गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स मीटमध्ये सहभागी होतील. यानंतर, नीरज चोप्रा ५ जुलै रोजी बेंगळुरूमध्ये क्लासिक खेळेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 -सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १,०६३ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १८ हजार १३० कोटी...