Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनया सिंगरसोबत होणार नेहा कक्करचं लग्न

या सिंगरसोबत होणार नेहा कक्करचं लग्न

मुंबई – Mumbai

बॉलिवूडची टॉप सिंगर नेहा कक्करच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वीही तिच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. याआधी रिअॅलिटी टीव्ही शो इंडियन आयडलच्या शेवटच्या सीझनमध्ये नेहा कक्कड़ आणि आदित्य नारायण लग्न करणार असल्याची सतत चर्चा सुरू होती, मात्र नंतर हे केवळ कार्यक्रमासाठी करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. आता मात्र नेहा या महिन्या अखेरीस बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा आहेत.

- Advertisement -

यापूर्वी नेहा कक्कर ही अभिनेता हिमांश कोहलीसोबत बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होती, ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले, दोघांनी सोशल मीडियावर एकमेंकावर अनेक आरोप केले. आता पुन्हा एकदा नेहा कक्करच्या लग्नाची बातमी येत आहे.

नेहा कक्करनं ठरवले आहे की, ती लग्न करणार आहे. बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये सिंगर रोहनप्रीत सिंगशी नेहा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रोहनप्रीत आणि नेहा या महिन्याच्या अखेरीस लग्न करू शकतात. दोघांचे कुटुंबियही एकमेकांना भेटल्याचे सांगितले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...