Friday, March 28, 2025
Homeनगरनेहरु गार्डनमधील रेल्वे गाडी रुळावरुन घसरली

नेहरु गार्डनमधील रेल्वे गाडी रुळावरुन घसरली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील नेहरू गार्डन मधील रेल्वे गाडी रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात सात वर्षांचा बालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

संगमनेर नगर पालिकेच्या नेहरू गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी रेल्वे गाडी चालविली जाते. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही रेल्वे गाडी लहान मुलांना घेऊन जात असताना या रेल्वे गाडीला अपघात झाला. रेल्वे गाडी रुळावरून खाली घसरली व त्यात एक लहान बालक विराज मारुती शिंदे (वय 7, राहणार संजय गांधी नगर, संगमनेर) हा गंभीर जखमी झालेला आहे.

या अपघातात या बालकाच्या डोक्याला, तोंडाला व हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यास लोणी येथे उपचारार्थ हलवण्यात आलेले आहे. अपघातासाठी रेल्वे चालक व नगरपालिका प्रशासनाला दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण; हत्या की...

0
मुंबई | Mumbaiअभिनेता सुशांत राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने पाच वर्षानंतर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई...