Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNepal Gen-Z Protest: नेपाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; संसद जाळली, अर्थमंत्र्यांना पळवून पळवून...

Nepal Gen-Z Protest: नेपाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; संसद जाळली, अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारलं, Video Viral

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये ओली सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आधी सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झाले होते. आता निदर्शनाने हिंसक वळण घेतले आहे. निदर्शकांनी मंत्र्यांवर हल्ले केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काठमांडूमध्ये निदर्शकांनी नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली आहे. नेपाळमधून येणाऱ्या व्हिडिओमध्ये, काठमांडूच्या एका रस्त्यावर अर्थमंत्री बिष्णू प्रसाद दिसत आहेत.

यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेरले होते. यादरम्यान आंदोलनकर्ते त्यांचा पाठलाग करतात. यादरम्यान एक आंदोलनकर्ता त्यांना लाथ मारतो. लाथ लागल्यानंतर ते खाली पडतात आणि पुन्हा उठून धावू लागतात. यावेळी आंदोलनकर्ते त्यांना पकडून घेऊन जातात. बिष्णू प्रसाद पौडेल नेपाळचे उपपंतप्रधानही आहेत.

- Advertisement -

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी देशाचे लष्करप्रमुख अशोक सिंघल यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिला आहे. लष्करप्रमुख अशोक सिंघल यांनी केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. यानंतर ओली यांना त्यांचे पद सोडण्यास भाग पाडण्यात आले.

YouTube video player

पौडेल यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षण सोडले आणि कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. ते अनेक वेळा देशाचे अर्थमंत्री राहिले आहेत, याशिवाय ते संरक्षण मंत्री देखील राहिले आहेत. बिष्णू प्रसाद पौडेल हे नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) (सीपीएन-यूएमएल) चे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत.

दरम्यान, आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली आहे. आंदोलक संसद भवनात घुसले आहेत आणि प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत. संसद भवनात भीषण आग लागली आहे. संसद भवनातून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. आंदोलकांनी अनेक मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली आहे. सिंह दरबार संपूर्ण आंदोलकांनी भरला आहे.

सध्या नेपाळमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर, नेपाळी सैन्य आता मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानांमध्ये सुरक्षा पुरवली आहे. सैन्य हेलिकॉप्टरद्वारे मंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. प्रत्यक्षात, देशभरात अनेक ठिकाणी निदर्शकांनी जाळपोळ केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...