Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNepal President Resigns: नेपाळमध्ये मोठ्या घडामोडी; पंतप्रधान केपी शर्मा ओलींनंतर आता नेपाळच्या...

Nepal President Resigns: नेपाळमध्ये मोठ्या घडामोडी; पंतप्रधान केपी शर्मा ओलींनंतर आता नेपाळच्या राष्ट्रपतींचा राजीनामा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि कथित भ्रष्टाचाराविरुद्ध Gen-Zचे तीव्र निदर्शने सुरूच आहेत. Gen-Z चळवळीने नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणला आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर आता देशाचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिल्याची बातमी आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यासह सर्व मंत्रिपदे रिक्त झाली आहेत. राजधानी काठमांडूमध्ये निदर्शकांचा गोंधळ सुरूच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी काही तासांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तरुणांचा संताप लक्षात घेता स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ते सध्या अज्ञात स्थळी गेले आहेत. तर दुसरीकडे सरकारच बरखास्त झाल्याने सध्या या देशातील परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही आपल्या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या राजीनाम्यानंतर आता नेपाळच्या कारभाराचे सूत्र सध्यातरी लष्कराकडे आहे.

- Advertisement -

हिंसक निदर्शाने मोठे नुकसान, अनेकांचा मृत्यू शेकडो जखमी
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ४०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली, तसेच पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या वैयक्तिक निवासस्थानांवर हल्ला केला आणि तोडफोड आणि जाळपोळ केली.

माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबांना बेदम मारहाण
संतप्त निदर्शकांनी नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडू येथील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक निदर्शक विष्णू पौडेल यांच्या छातीवर लाथ मारत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, निदर्शकांनी माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’, शेर बहादूर देउबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या खाजगी निवासस्थानांना आग लावली, ज्यामुळे देशभर भीती आणि अराजकता पसरली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....