Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजLove Story : हृदय पिळवटून टाकणाऱ्या श्रीजना आणि विवेक पंगेनीची 'एक अधुरी प्रेमकहाणी'

Love Story : हृदय पिळवटून टाकणाऱ्या श्रीजना आणि विवेक पंगेनीची ‘एक अधुरी प्रेमकहाणी’

मुंबई | वृत्तसंस्था

आपण चित्रपट, कथा कांदबरी ते सर्वसामान्यांपर्यंत संघर्षमय अशा प्रेमकथा बघत असतो. चित्रपटांतून अनेकदा आपण या प्रेमकथा अजरामर झालेल्या बघितल्या आहेत. तर खऱ्या आयुष्यातही बऱ्याच जोडप्यांच्या प्रेमकथा सुखी संसार करतांना दिसत आहेत. अशीच गेल्या काही दिवसांपासून नेपाळी इन्फ्लुएन्सर श्रीजना सुबेदी आणि विवेक पंगेनी (Srijana Subedi and Bibek Pangeni) यांच्या प्रेमकहाणीची चर्चा सोशल मीडियावर सुरु असून या दोघांची प्रेमकहाणी आता कायमची अमर झाली आहे.

- Advertisement -

विवेक आणि श्रीजनाची प्रेमकथा ही संघर्षाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी ढाल बनून कसे उभे राहायचे आणि आयुष्यातील सर्वात कठीण काळात एकमेकांना साथ कशी द्यायची हे शिकवते. शाळेच्या काळापासून या दोघांमध्ये प्रेम होते, सहा वर्ष प्रेम केल्यानंतर दोघांनी २०२० साली लग्नगाठ बांधली.दोघेही आपल्या आयुष्यात खूप आनंदी होते. विवेक  पंगेनी याने अमेरिकेतील एका विद्यापीठात (University) पीएचडीसाठी प्रवेश घेतला, परंतु, २०२२ साली विवेकला कळलं की आपल्याला ४ ब्रेन ट्यूमर आहे. त्यानंतर त्याची पत्नी श्रीजनाने खचून न जाता तन मन धन सर्व काही पणाला लावून त्याची शेवटपर्यंत सेवा केली.

डॉक्टरांनी त्यांना थोडाच वेळ तुमच्या हाती शिल्लक आहे असे सांगितले होते. कधी ना कधी आपल्या पतीला निरोप द्यायचा आहे हे श्रीजनाला माहिती होते, त्यामुळे ही अर्धांगिनी कधीही मागे सरली नाही. बिबेकचा शेवटचा प्रवास सुरू असताना एखाद्या तान्ह्या बाळाची आईने (Mother) काळजी घ्यावी तशी काळजी श्रीजनाने घेतली. त्यामुळे विवेकला त्याच्या आजाराशी लढण्यात श्रीजनाने दिलेली साथ अभूतपूर्व होती. एक पत्नी म्हणून श्रीजनाने निभावलेलं कर्तव्य, जेव्हा-जेव्हा आठवले जाईल तेव्हा या दोघांच्या प्रेमाची चर्चा होईल. विवेक पंगेनीचे गुरुवार (दि.१९) डिसेंबर रोजी स्टेज-४ ब्रेन कॅन्सरशी लढत असताना निधन झाले. त्यानंतर पत्नी श्रीजनाने कॅन्सरशी लढाई आणि त्यांच्या आयुष्यातील हे चढ-उतार आणि कठीण दिवस आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पोस्ट करत शेअर केले आहेत. हे व्हिडीओ अतिशय हृदय पिळवटून टाकणारे आहेत.

दरम्यान, दुसरीकडे विवेक आणि श्रीजनाचे फोटो व व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत ही सर्वात अनोखी प्रेमकथा असल्याचे म्हटले आहे. कॅन्सरशी लढण्यासोबतच श्रीजना प्रत्येक पावलावर विवेकच्या पाठीशी ठामपणे उभी होती. विवेकच्या अंत्यसंस्काराच्या वेळी श्रीजनाची अवस्था अत्यंत वाईट होती. तिचा आक्रोश आणि पतीवरील प्रेम अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून बघत आहेत. मात्र, त्यांची ही प्रेमकथा खरोखरच निष्ठा आणि समर्पणाचे उदाहरण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...