Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात होणार नाही; डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितले

नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात होणार नाही; डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितले

नाशिक | Nashik

नाफेडच्या (Nafed) माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कांदा विक्री (Onion Selling) केला जाणार नाही त्याचबरोबर नेपाळमधून (Nepal)आयात केलेला कांदा महाराष्ट्रात येणार नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी दिली आहे.

- Advertisement -

“नेपाळमधून जो कांदा आयात होणार आहे तो कांदा इथे विक्री केला जाणार आणि इथल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा बाजार पडणार अशा चर्चा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. या चर्चा चुकीच्या आहेत. नाफेड कांदा इथे खरेदी करेल पण इथे विक्री करणार नाही. नाफेडकडून हा कांद्याचा स्टॉक इतर राज्यांना देण्यात येणार आहे. ज्या राज्यांना गरज असेल त्या राज्यांना हा कांदा निर्यात केला जाणार आहे.”

यामुळे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात राजकारण तापले आहे. कांदा उत्पादक या मुद्द्यावर आक्रमक बनत चालले आहेत. अशा परिस्थिती भारती पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच काल नाफेडने देखील एक महत्त्वाचे परिपत्रक काढत नाफेड खुल्या बाजारात कांदा विक्री करण्याबाबतचा निर्णय १५ सप्टेंबर नंतर घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

“केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढले असून ज्या राज्यांना गरज आहे ते राज्य फक्त आणि फक्त नेपाळमधून कांदा आयात करू शकतात अशी परवानगी दिली आहे, पण ते बंधनकारक नाहीये, ते शेजारच्या राज्याकडूनही कांदा घेऊ शकतात. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात चुकीच्या चर्चा केल्या जात असून महाराष्ट्रातील कांद्याचा भाव पडणार असे बोलले जातेय पण हे सर्व चुकीचे आहे” असे मत भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.

यामुळे निश्चितच कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. तसेच केंद्र शासनाने नेपाळमधून कायदा आयात करण्यासाठी परवानगी दिली असल्याने या निर्णयाचा देखील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र केंद्र शासनाने ही परवानगी ज्या राज्यांना कांद्याची गरज आहे त्याच राज्यांना देऊ केली आहे.

एकंदरीत भारती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नाफेड कांदा विक्री करणार नाही आणि महाराष्ट्रात नेपाळमधून देखील कांदा आयात होणार नाही यामुळे कांद्याचे बाजार भाव आगामी काही दिवस तेजीतच राहतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या