मुंबई | Mumbai
‘मुड बनालिया’ हे पंजाबी भाषेतील अमृता फडणवीसांचे (Amruta Fadnavis) गीत सहा दिवसांपूर्वी युट्यूबवर (Youtube) प्रदर्शित झाले. या गाण्याच्या प्रदर्शनापूर्वीच अमृता फडणवीस यांनी त्या गाण्याच्या यशाबद्दल विश्वास व्यक्त केला होता….
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही ते गाणं आवडलं आहे, पण ट्रोल (Troll) होण्याची शक्यता स्वत: देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली हे ही अमृता फडणवीस यांनी सांगितले होते.
त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘मुड बनालिया’ हे गीत प्रदर्शित होताच अवघ्या काही दिवसांच्या कालावधीतच या गीताला लाखो लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून बघितले आहे.
आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक लोकांनी या गीताला पाहिले आहे, यासोबतच सव्वा लाखाच्या आसपास या गाण्याला लाईक्सही मिळाल्या आहेत. यावरुन हे गीत लोकांचे मनोरंजन करण्यात आघाडीवर असले तरी, त्या गीताला युट्यूब वर मिळालेल्या प्रतिक्रियांनी खरं मनोरंजन करायला सुरुवात केली आहे.
Viral Video : नवरदेवासोबत लग्नाआधी घडली दुर्घटना; वधूने केले असे काही की पाहुणेही…
त्यामध्ये सिद्धेश्वर मुळे हे प्रेक्षक लिहितात, “हे गाणं फूल व्हॉल्युम वर वाजवलं, आजूबाजूचे सर्व डास पळाले….”
योगेश नावाचे एक नेटकरी लिहितात, हे गाणं ऐकूण ५ वर्षांपासून कोमात असलेले माझे मामा कोमातून बाहेर आले…त्यांनी उठून स्वत:च्या हाताने TV बंद केला… Thank you so Much.”
सिद्धार्थ चाबुकस्वार यांची प्रतिक्रिया.., “हे गाणं ऐकूण ते रशिया वाले यूक्रेन सोडून भारताच्या मागे लागतील…”
‘शार्क टँक इंडिया’मध्ये पाऊल ठेवताच ‘त्यांचं’ नशिब पालटलं; वाचा नेमकं काय घडलं?
या आणि अशा शेकडो प्रतिक्रिया आपल्याला हसायला भाग पाडतील, म्हणून या गाण्यापेक्षा त्याला मिळालेल्या प्रतिक्रियांनीच जास्त मनोरंजन होत आहे हे मात्र निश्चित.