Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशएकतर्फी ठरवलेली नियंत्रण रेषा अमान्य

एकतर्फी ठरवलेली नियंत्रण रेषा अमान्य

नवी दिल्ली –

चीनने पुन्हा एकदा एलएसीच्या विषयावर नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर

- Advertisement -

‘1959 साली चीनने एकतर्फी ठरवलेली नियंत्रण रेषा भारताने कधीही मान्य केलेली नाही. आमची भूमिका कायम आहे. चीनसह सर्वांनाच ती माहित आहे’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

चीनचे तत्कालिन पंतप्रधान झोउ एनलाई यांनी सात नोव्हेंबर 1959 रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना एक पत्र पाठवले होते. त्यात प्रस्तावित केलेल्या नियंत्रण रेषेचे चीन पालन करेल असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाील सध्याच्या प्रवक्त्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. त्यावर भारताने चीनची 1959 सालची एलएसी बद्दलची व्याख्या अजिबात मान्य करणार नाही असे स्पष्ट केले आहे.

एलएसी वर शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी 1993 साली झालेला करार, 1996 साली दोन्ही बाजूंमध्ये विश्वास निर्माण करण्यासंबंधी झालेला करार, 2005 साली भारत-चीन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी झालेला करार या करारांचे दाखले अनुराग श्रीवास्तव यांनी दिले.

दरम्यान, लडाखच्या पूर्वभागात वास्तविक नियंत्रण रेषेवरुन भारत-चीनमध्ये वाद कायम आहे. विश्‍वासघातकी चीनने पुन्हा एकदा एलएसीच्या विषयावर नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही पलटवार करत अत्यंत कठोर शब्दात चीनचा एलएसी संबंधीचा दावा फेटाळला आहे. भारतीय भूभागात अतिक्रमण करणार्‍या चीनने 1959 साली एकतर्फी नियंत्रण रेषा ठरवली होती. चीन त्याचा दाखला देत आहे. पण भारताने चीनचा हा एकतर्फी दावा मान्य करण्यास नकार दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या