धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना बाधितांची रूग्ण संख्या वाढीने पुन्हा वेग घेतला आहे. आज दिवसभरात तब्बल 126 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 3 हजार 689 वर पोहाचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील धुळ्यातील भीमनगरातील 70 वर्षीय महिला, वडजाई रोड, धुळे येथील 72 वर्षीय पुरुष व धोबी गल्ली, धुळे येथील 40 वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत एकूण 125 जणांना कोरोनाने बळी घेतलाआहे.
रात्री सात वाजता खाजगी लॅब मधील 68 अहवालापैकी 34 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात अग्रवाल नगर धुळे 8, पश्चिम हुडको , मोहाडी , आंबेडकर चौक, संतोषी माता मंदिर, जमनागिरी रोड, बेटावद सुरत बायपास रोड 1, मोघण ता. धुळे, काळखेडे ता.धुळे 1, जैताणे ता. साक्री 1, पोस्ट ऑफिस जवळ शिंदखेडा, वाखरकर नगर धुळे, खोल गल्ली धुळे, कुमार नगर धुळे, शिरूड बाजार पेठ ता.धुळे, विजय हाउसिंग सोसायटी चाळीसगाव रोड, धुळे, नेर ता. धुळे, खालचे गाव शिरपूर कमखेडा, अकबर चौक, धुळे, साक्री रोड धुळे, नकाणे रोड धुळे, राजेंद्र नगर, नगावबारी धुळे, नवनाथ नगर धुळे येथील प्रत्येकी एक रूग्ण व कुसुंबा ता. धुळे येथील दोन रूग्णाचा समावेश आहे.
रात्री आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील 17 अहवालांपैकी कापडणे 2 व वल्लभ नगर, चितोड रोडवरील प्रत्येक एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील अँटीजन टेस्टच्या 51 अहवालानुसार 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात कुसुंबा 3, बोरकुंड 3, जुनवणे 1, अंबोडेतील एक रूग्णा आहे.
महापालिका पॉलिकेक्निक सीससी मधील 86 अहवालांपैकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात मोराणे, न्यू नॅशनल बेकरी, एकता नगर बिलाडी रोड, देवपूर, गणेश कॉलनी, स्वामी नारायण सोसायटी, जुने धुळे, राजेंद्र नगर,धनाई पुनाई कॉलनीतील प्रत्येकी एका रूग्णाच समावेश आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 30 अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात सुभाष कॉलनी, तिरुपती नगर, सिंधी कॉलनी, विद्यावर्धनी शिरपूर व थाळनेर येथील रूग्णांचा समावेश आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 48 अहवालांपैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात तावखेडा 3, माळीच 5 व गोपाळपूरा, सर्वोदय कॉलनी, पोलीस स्टेशन जवळ, पाटील गल्ली, कोठारी पार्क, प्रोफेसर कॉलनी, विद्या नगर, विरदेल, ग्रामपंचायत चौक, भदाणे, नंदुरबार चौफुली, सिंधी कॉलनीतील प्रत्येक एक रूग्ण आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 51 अहवालांपैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात अलंकार सोसायटी, जुने धुळे, जीएमसी 1, देवचंदन 1, शांती नगर अभय कॉलेज 1, शिंदखेडा येथील पत्येक एक रूग्ण व शिरपूर 2 व धुळ्यातील पाच रूग्णांचा समावेश आहे.
खाजगी लॅबमधील 4 अहवालांपैकी जीटीपी कॉलनी व मनमाड जीनमधील प्रत्येकी एक रूग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
महापालिका अँटीजन टेस्टच्या 25 अहवालानुसार 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 3 हजार 689 वर पोहाचली आहे.