धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात बुधवारी 67 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर शिरपूर येथील 47 वर्षीय पुरूषाचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 126 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 3 हजार 756 एवढी झाली आहे.
रात्री नऊ वाजता जिल्हा रुग्णालयातील 65 अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.त्यात उन्नती नगर , चितोड रोड, यशोधन नगर वलवाडी, मास्तर वाडी धुळे, 80 फूटी रोड, भगवा चौक, लक्ष्मी नगर, साईबाबा सोसायटी, अमळनेर जळगाव येथील प्रत्येेकी एक रूग्ण व धुळ्यातील दोन रूग्णांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय अँटीजन टेस्टच्या 89 अहवालांपैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शिरूड 1, कुसुंबा 2, एसआरपीएफ 2, सोनगीर 1, जुनवणे 2, सुयोग नगर धुळे 1, चितोड 2 व मुकटीतील एका रूग्णाचा समावेश आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 76 अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात वाघाडी 1, थाळनेर 2, शिंगावे 2, भोरटेक 2, मांडळ शिवार, अमोदे , मांजरोद, सिंधी कॉलनी, खरेवाड़ा, सरस्वती कॉलनी, जैन मंदिर, अशोक नगर, सुदर्शन नगर, जयहिंद कॉलनी शिरपुर येथील प्रत्येकी एका रूग्णांचा समावेश आहे.
महापालिका पॉलिकेक्निक सीसीसी मधील 37 अहवालांपैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात गल्ली नं 14 व जुने धुळ्यातील प्रत्येकी एक व वंजारी गल्लीतील चार रूग्णांचा समावेश आहे.
खाजगी लॅबमधील 59 अहवालापैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सुशील नगर धुळे, शिरूड ता धुळे, अवधान, पांच कंदील, मनमाड जीन बडगुजर प्लॉट 80 फुटी रोड, पद्मनाभ नगर साक्री रोड, दोंडाईचा, कासारे ता. साक्री, विखरण, राणीपुरा ता. शिंदखेडा, शिवाजी नगर साक्री, खालचे गाव, शिरपूर व गोपाळ नगर पिंपळनेर येथील प्रत्येकी एक रूग्ण आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 52 अहवालांपैकी 7 अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. जीएमसी, थाळनेर, शिरपुर, पिंपळनेर, मोघन येथील प्रत्येकी एक रूग्ण व धुळे 2 व खेडगाव जळगावातील एक रूग्णांचा समावेश आहे.