Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशMK Stalin : "नवविवाहित जोडप्यांनी १६ मुलं जन्माला घालावीत", CM चंद्रबाबूंनंतर एम...

MK Stalin : “नवविवाहित जोडप्यांनी १६ मुलं जन्माला घालावीत”, CM चंद्रबाबूंनंतर एम के स्टॅलिन यांच वादग्रस्त विधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी नवविवाहित जोडप्यांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालावी, असे आवहन केले आहे. दरम्यान, स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, “आता वेळ आली आहे की, नवविवाहित जोडप्यांनी आपल्‍या वैवाहिक आयुष्‍यात एकूण १६ मुलं जन्माला घालावीत”.

चेन्नई येथे झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यानिमित्त बोलताना एम के स्टॅलिन म्हणाले, आपली लोकसंख्या कमी होत आहे. याचा परिणाम आपल्या लोकसभांच्या जागांवरही होईल. यामुळे आपण १६-१६ मुले जन्माला घालायला हवीत. स्टॅलीन यांनी दावा केला आहे की, पूर्वी जोडपे १६ प्रकारची संपत्ती मिळवण्याचा आशीर्वाद देत होते. यामुळे, कदाचित आता १६ प्रकारच्या सपत्तीऐवजी १६ मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

सीएम एमके स्टॅलिन यांनी मानव संसाधन आणि सामाजिक न्याय मंत्री शेखर बाबू यांचे कौतुक करत दावा केला की, द्रमुक सरकारने मंदिरांची देखभाल आणि संसाधने सुलभ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे खरे भक्त कौतुक करतात. तसेच, जे कोल भक्तीचा मुखवट्या प्रमाणे वापर करतात, ते लोक गडबडलेले आहेत आणि डीएमके सरकारच्या यसाला आवाहन देत तक्रार दाखल करत आहेत.

नेमके काय म्हणाले स्टॅलिन?
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दावा केला की, पूर्वीचे वडीलधारी लोक नवविवाहित जोडप्यांना अनेक प्रकारची मालमत्ता मिळवण्यासाठी आशीर्वाद देत असत. जेव्हा वडिलधारी लोक म्हणायचे की तुम्हाला १६ मुले असावीत आणि समृद्ध जीवन जगावे, तेव्हा त्याचा अर्थ १६ मुले नसून १६ प्रकारची मालमत्ता होती. ज्याचा उल्लेख लेखक विश्वनाथन यांनी त्यांच्या पुस्तकात गाय, घर, पत्नी, मुले, शिक्षण, जिज्ञासा, ज्ञान, शिस्त, जमीन, पाणी, वय, वाहन, सोने, संपत्ती, पीक आणि स्तुती या स्वरूपात केला आहे; परंतु आता कोणीही तुम्हाला १६ प्रकारची संपत्ती मिळवण्याचा आशीर्वाद देत नाही मुले आणि एक समृद्ध जीवन जगणे हाच आशीर्वाद देतात, असेही ते म्हणाले.

यापूर्वी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, एन. चंद्रबाबू नायडू यांनी रविवारी वाढत्या वृद्ध लोकसंख्येसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. याचा हवाला देत त्यांनी दक्षिणेकडील राज्यांतील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही तर, “सरकार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविता याव्यात, यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहे,” असेही नायडू यांनी म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...