Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्या“आता ही शेवटची संधी”, सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांवर पुन्हा ताशेरे; दिले ‘हे’...

“आता ही शेवटची संधी”, सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांवर पुन्हा ताशेरे; दिले ‘हे’ निर्देश!

दिल्ली | Delhi

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत. सॉलिस्टर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टी दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी आणि सुधारीत वेळापत्रक द्यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी देण्यात आली आहे. ३० तारखेला विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक सादर करावे लागेल असे न्यायालयाने म्हटलं आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिली जात आहे. या दसऱ्याच्या सुट्टीत सॉलिस्टर जनरल अॅड. तुषार मेहता यांच्यासोबत बसून विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक बनवावे. पुढील सुनावणीपर्यंत हे वेळापत्रक आलं नाही तर कोर्ट स्वत: वेळापत्रक देईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

आजच्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर अत्यंत गंभीर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत. सॉलिस्टर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टी दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी आणि सुधारीत वेळापत्रक द्यावं, असं स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसेच, अध्यक्षांनी माध्यमांशी कमी बोलावं, कारण कोर्टही टीव्ही पाहत असतं, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्ष राहुल नार्वेकर सणसणीत टोला देखील हाणला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या