नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. नाशिक विभागात नुकत्याच दोन नव्या इलेक्ट्रिक बस इ-शिवाई दाखल झाल्या.त्या नाशिक-पुणे मार्गावर धावणार आहेत.
सध्या महामंडळाच्या ताफ्यात 300 हून अधिक बस आहेत. यात शिवशाहीचाही समावेश आहे. आता प्रवाशांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधांयुक्त अशी ई- शिवाई ही इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल झाली आहे. राज्यात औरंगाबाद, पुणे याठिकाणी ही बससेवा सुरू आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक येथील ठक्कर बझार (नवीन सीबीएस) स्थानकातून ई शिवाई बस पुण्यासाठी मार्गस्थ होईल. बसमध्ये 45 आसनांची व्यवस्था असून दोन जागांच्या गटासाठी युएसबी स्वतंत्र चार्जर, वाहन आरोग्य देखरेख उपकरण, इन्फोटेन्मेंट आदी व्यवस्था देण्यात आल्या आहेत. नाशिक विभागात दोन बस आल्या असून ही संख्या नऊपर्यंत पोहचणार आहे.
या बस नाशिक-पुणे अशा दिवसाला 18 फेर्या करणार आहेत. वाहनांची दुरूस्ती देखभाल, वाहनचालक ही व्यवस्था खासगी तत्वावर ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. नाशिक विभागात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग तपासणी करुन पुढील दोन दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावतील. या संदर्भात आगारात चाचपणी सुरू आहे. शिवशाही बसच्या प्रवासी दरातच इ शिवाई ही बससेवा सुरू राहणार आहे.