मुंबई – Mumai
इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) IPL यंदा यूएईत होणार्या तेराव्या हंगामासाठीचा नवा लोगो जाहीर केला आहे…..
यावेळी आयपीएल स्पर्धा ही ’ड्रीम ११ आयपीएल’ DREAM11 IPL अशी ओळखली जाणार आहे. आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल.
यूएईत होणार्या आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला आहे. ड्रीम ११ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. प्रायोजकत्वासाठी ड्रीम ११ ने २२२ कोटी रूपये मोजले असल्याचे वृत्त आयपीएलचे अध्यक्ष बिजेश पटेल यांनी दिले होते. मुख्य प्रायोजकाच्या शर्यतीत अनॲकॅडमी, टाटा आणि बायजूस हे देखील होते. अनॲकॅडमीने २१० कोटी, टाटाने १८० कोटी आणि बायजूसने १२५ कोटींची बोली लावली होती.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत टिवटर अकाऊंटवर आयपीएलचा नवा लोगो शेअर केला आहे. ड्रीम ११ ही मुंबईस्थित कंपनी असून २००८ पासून क्रिकेटशी संबंधित आहे. पहिली चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतील संघ ओटागो व्होल्टस आणि ड्रीम ११ यांचा करार झाला होता. आयसीसीची अधिकृत ङ्गँटसी क्रिकेट प्लॅटफॉर्म भागीदार असलेली ही कंपनी आता आयपीएलसोबतही जोडली गेली आहे.
जूनमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याविषयी मत झाले होते. त्यानंतर, प्रायोजक म्हणून आयपीएलने विवोला कायम ठेवल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध नोंदवला. या निषेधानंतर, विवोने प्रायोजकत्वातून माघार घेतल्याची बातमी समोर आली. विवोने २०१८ मध्ये २१९९ कोटींसह पाच वर्षांसाठी करार केला होता. हा करार २०२२ मध्ये संपुष्टात येणार होता.