Tuesday, June 25, 2024
Homeदेश विदेशNew Parliament : नव्या संसदेचा आजपासून 'श्रीगणेशा', खासदारांना मिळणार खास गिफ्ट

New Parliament : नव्या संसदेचा आजपासून ‘श्रीगणेशा’, खासदारांना मिळणार खास गिफ्ट

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच याच शुभमुहूर्तावर आजपासून नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार आहे. नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश सकाळी ११ वाजता होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः सर्व खासदारांचं स्वागत करणार आहेत.

हा विशेष दिवस ऐतिहासिक बनवण्यासाठी संसद, राज्यसभा (Rajya Sabha) आणि लोकसभा (Lok Sabha) या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत. भेटवस्तूंमध्ये संविधानाची प्रत, ७५ रुपयांचं चांदीचं नाणं आणि नवीन संसदेचा शिक्का असलेली पुस्तिका यांचा समावेश आहे. याशिवाय संसद भवनाच्या सीलसह इतर अनेक भेटवस्तूही यात असतील.

यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होणार आहे. तर त्याच भवनमध्ये २ वाजून १५ मिनिटांनी राज्यसभेच्या (Rajyasabha) कामकाजाला सुरुवात होणार आहे. या नव्या संसद भवनाची सर्व तयारी करण्यात आली आहे. तर या नव्या संसदभवनामध्ये १२८० सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नव्या संसद भवनची चर्चा सुरु असली तरी त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अत्याधुनिक आणि विशाल अशा परिसरात या संसद भवनची निर्मिती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यामध्येच या नव्या संसद भवनचे उद्घाटन केले होते. या भव्य दिव्य नव्या संसद भवनमध्ये लोकसभा कक्षामध्ये ८८८ सदस्य तर राज्यसभा कक्षेमध्ये ३०० सदस्य आरामामध्ये बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जर या दोन्ही सदनांची बैठक घेण्याचे ठरले तर लोकसभा चेंबरमध्ये किमान १२८० सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी संसदेच्या नव्या इमारतीची पायाभरणी केली होती. त्यानंतर तीन वर्षाच्या आधीच या इमारतीची उभारणी करण्यात आली. नव्या संसदेची इमारत ही ६४,५०० चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. ही चार मजली इमारत त्रिकोणी आकाराची आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही नवी संसद जुन्या संसद भवनपेक्षा १७,००० चौरस मीटर मोठे आहे. ज्या प्रमाणे ही इमारत भव्य दिव्य आहे, त्याच प्रमाणे त्याला अत्याधुनिकतेचीही जोड देण्यात आली आहे. या इमारतीवर भूंकंपाचाही कोणताही परिणाम त्यावर होणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या