Wednesday, May 29, 2024
HomeजळगावRTO दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका

RTO दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका

जळगाव – jalgaon

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (rto) परिवहनेतर संवर्गातील दुचाकी (bike) वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19/ ईडी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार असून ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी परिवहन कार्यालयात दिनांक 8 व 9 मार्च, 2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज जमा करावे. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहेत.

- Advertisement -

पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (डी.डी.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. आकर्षक क्रमांकाची पावती प्राप्त झाल्यावर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक असेल. पावतीची विधीग्राह्यता ही फक्त 30 दिवसांची असेल.

यू-ट्यूबवरून नकली नोटा तयार करणारा गजाआड

दिनांक 8 व 9 मार्च 2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील व दि. 10 मार्च 2023 रोजी अर्जाची छानणी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास दि. 10 मार्च 2023 दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष डी.डी. स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. दि. 10 मार्च 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता बंद लिफाफे सहा/ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे समक्ष उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल व उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळवि

यू-ट्यूबवरून नकली नोटा तयार करणारा गजाआड

- Advertisment -

ताज्या बातम्या