Thursday, December 12, 2024
Homeराजकीयपंकजा मुंडे, विनोद तावडे यांना नवी जबाबदारी

पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना नवी जबाबदारी

मुंबई | Mumbai

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीम महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांना घेण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून या अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आली होती. आता नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मात्र पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडे व तावडे यांच्यासह महाराष्ट्रातून विजया रहाटकर व सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर, खासदार हीना गावित यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १३ जणांनाराष्ट्रीय सचि म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रालते ४ नेते आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या