Saturday, July 27, 2024
Homeनाशिकलॉन्ग मार्चमध्ये नवा ट्विस्ट! शिष्टमंडळाचा बैठकीस नकार; जे. पी. गावित म्हणाले, आता...

लॉन्ग मार्चमध्ये नवा ट्विस्ट! शिष्टमंडळाचा बैठकीस नकार; जे. पी. गावित म्हणाले, आता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी…

मुंबई | Mumbai

शेतकरी व कामगार सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांसाठी विधानसभेवर नाशिक ते मुंबई पायी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. काल लॉन्ग मार्च इगतपुरीत मुक्कामी होता. आज लाल वादळाने मुंबईच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवली आहे…

- Advertisement -

आता किसान सभेच्या मोर्चात एक नवीन ट्विस्ट आला आहे. किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची आज सरकारसोबत बैठक होणार होती. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक काल सरकारने रद्द केली. आज आंदोलकांनी बैठकीत जाण्यास नकार दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कांदा अनुदान सहजतेने मिळेल का?

मोर्चा घेऊन मुंबईत जाणार मात्र चर्चेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सबंधित मंत्र्यांनी यावे, अशी भूमिका जे. पी. गावित यांनी घेतली आहे. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीला सरकारने प्राधान्य दिले, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे पाहायला सरकारला वेळ नाही म्हणत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहरात एच3 एन2 रुग्ण संख्येत वाढ; स्वच्छता बाळगण्याचे मनपाचे आवाहन

- Advertisment -

ताज्या बातम्या