Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशनव्या वर्षाच्या उत्साहाला गालबोट; बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा मृत्यू, अनेक जण...

नव्या वर्षाच्या उत्साहाला गालबोट; बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
२०२५ चा निरोप देण्यासाठी आणि २०२६ या नव्या वर्षाचे उत्सवात स्वागत करण्यासाठी हॉटेल्स बार-पबमध्ये अनेकजण जातात. असाच जल्लोष सुरु असताना एका बारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्वित्झर्लंडमधील क्रान्स मॉन्टाना येथील बारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक लोक ठार झाले असून काही जण जखमी झाले आहेत.

नवीन वर्षाच्या सेलीब्रिशेनवेळी स्वित्झर्लंडमध्ये बारमध्ये अचानक स्फोट झाला अन् आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा झाल्याचे वृत्त आहे. अनेकजण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचा भडका का उडाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या आगीचे व्हिडिओ, फोटो सोशल मिडिया व्हायरल झाले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कॉन्स्टेलेशन बारमध्ये मध्यरात्री सुमारे 1.30 वाजताहा स्फोट झाला. या दुर्घटनेमुळे नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

लाडक्या बहीणींना सरकारचं नव वर्षाचं गिफ्ट; बँक खात्यात १५०० जमा व्हायला सुरवात, तुम्हाला मिळाले का?

YouTube video player

“मृत्यू झालेल्यांपैकी अनेक जण पर्यटक असल्याचे सांगितले जात आहे, जे सुट्ट्यांसाठी क्रान्स-माँटाना येथे आले होते. स्फोटाच्या वेळी बारमध्ये शंभरहून अधिक लोक आतमध्ये होते,” असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले आहे. “आम्ही आमच्या तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, पण हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्की रिसॉर्ट आहे, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात,” असेही ते पुढे म्हणाले.

बारमध्ये आग भडकल्यानंतर लोक सैरावैरा धावत असल्याचे दिसत आहे. आरडाओरड, किंकाळ्याही ऐकू येत आहे. काही लोक बारच्या बाहेर पळत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आगीची घटना समोर येताच स्वित्झर्लंड सरकारकडून तात्काळ मदत सुरू आहे. बाधितांच्या कुटुंबांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी एअर-ग्लेशियर हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...