Tuesday, March 25, 2025
Homeनगरनववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईदर्शनासाठी 2 लाख भाविकांची गर्दी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईदर्शनासाठी 2 लाख भाविकांची गर्दी

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नववर्षाच्या निमित्ताने साई नगरीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी 2 लाखांवर भाविकांनी साई दर्शनाने नवीन वर्षाची सुरूवात केली. गेल्या दोन दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. नववर्षारंभी एका भाविकाने 206 ग्रॅमचा साडेतेरा लाख रुपये किमतीचा सुवर्णहार साईबाबांना अर्पण केला आहे. शिर्डी पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. भाविकांना ऊन, वारा, पाऊस लागू नये म्हणून अद्ययावत व वातानुकूलीत दर्शनबारी केली आहे. बुधवारी गर्दीने गेल्या काही वर्षातील वर्षाखेर व वर्षारंभातील गर्दीचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनरांग कॉम्प्लेक्सच्या बाहेर भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भाविकांचे दर्शन सुकर व लवकर कसे होईल यासाठी सातत्याने स्वत: फिरून गर्दी व्यवस्थापन करत होते. गर्दीमुळे गावकरी गेट व सर्व प्रवेशद्वारेही काहीकाळ बंद ठेवण्यात आले. साई मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे़ वर्षारंभी साईमूर्तीवर सुवर्णालंकार घालण्यात आले होते.

- Advertisement -

साईंच्या साक्षीने रविवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई मंदिरात साईनामाचा व भजनाचा गजर करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील यांच्यासह हजारो भाविकांनी मध्यरात्रीच साई दर्शन घेऊन नववर्षाचा श्रीगणेशा केला. दि. 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले असल्याने 1 जानेवारी रोजी पहाटेची काकड आरती झाली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडूळे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशांत सूर्यवंशी, अनिल धरम, साईप्रसाद खांडरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व अधिकारी गेले दोन दिवस अहोरात्र दर्शन व्यवस्था सुकर होण्यासाठी प्रयत्नात आहेत.

बुधवारी दिवसभर भाविकांचा ओघ कायम होता़ पालख्या घेऊन येणार्‍या पदयात्रींचाही यात समावेश होता. शिर्डीत निवास व्यवस्था व वाहनतळे हाऊसफुल्ल आहेत़ वाहनतळांची व स्वच्छतागृहांची नेहमीप्रमाणे वाणवा जाणवली. शहरातील उपनगरांकडे जाणार्‍या रस्त्यांच्या दोहो बाजुंना वाहनतळाचे स्वरूप आल्याने वाहतूक कोंडी झाली. मोबाईल व चप्पल ठेवण्यासाठी, लाडू पाकीटे घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री झालेल्या भाविकांच्या गर्दीने सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजवले. थेट मंदिरात शेकडो भाविकांची हातात मोबाईल घेवून नववर्षाचा ऐतिहासिक क्षण कैद करण्यासाठी झुंबड उडाली.

नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शिर्डी पोलिसांची कामगिरी अपयशी ठरली. बुधवारी झालेल्या भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डी शहरातील महामार्गावर लक्झरी बसेस, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच रिक्षा चालकांच्या मनमानीपणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी शिर्डीत सातत्याने होणारी वाहन कोंडीकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...