नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa
तालुक्यातील पाचुंदा येथील दुचाकी अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात आलेल्या रामदास लक्ष्मण खरात (वय 32 वर्षे) या जखमीचा काल शनिवार दि.11रोजी पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.परंतु हा अपघाती मृत्य आहे की मृत्यू याबाबद मात्र अद्याप संभ्रम आहे.रविवार दि.12 रोजी सकाळी पाचुंदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.
- Advertisement -
मृत्य व्यक्तीच्या सासुरवाडीकडील नातेवाइकांनी हा अपघाती मृत्यू नसून त्याच्या घरच्यांनीच खून केला आहे असा आरोप केल्याने पोलिसांनी त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दि.6 जुलै रोजी ही घटना घडूनही या प्रकरणी अद्याप कोणती गुन्हा दाखल नसल्याचे समजते.