Monday, November 25, 2024
Homeनगरनेवासा महायुतीचा उमेदवार ठरेना; शिंदे यांना सेनेची उमेदवारी मिळणार?

नेवासा महायुतीचा उमेदवार ठरेना; शिंदे यांना सेनेची उमेदवारी मिळणार?

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

शंकरराव गडाख यांनी 6 महिन्यांपासून विधानसभेची तयारी चालू केली असून त्यांचे तालुक्यातील प्रत्येक गावात 3 दौरे झाले आहेत. याउलट महायुतीमध्ये नेवाशाची जागा कुणाकडे व उमेदवार कोण अजूनही ठरत नाही. ही जागा शिंदे यांच्या सेनेला गेली असून प्रभाकर शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ज्ञानेश्वर पेचे, ऋषिकेश शेटे, सचिन देसरडा हे प्रमुख उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळावी व आपणच कसे दावेदार आहोत हे मुंबईत जाऊन वरिष्ठांना पटवून दिले आहे.

- Advertisement -

नेवाशाची जागा ही शिंदे यांच्या सेनेला गेली असून काहीही झाले तरी प्रभाकर शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. गडाख हे कुठल्या पक्षाकडून लढणार याची चर्चा झाली. परंतु दोन दिवसापूर्वी सुमारे 25 हजार लोकांचा अभूतपूर्व मेळावा गडाख यांनी घेतला व सर्व वावड्या कशा खोट्या होत्या याची माहिती त्यांनी जाहीर सभेत दिली. वास्तविक त्यांनी 6 महिन्यांपासून विधानसभेची तयारी केली असून घोंगडी बैठका, संवाद यात्रा, लग्न, सांत्वन भेटीच्या माध्यमातून सगळा तालुका पिंजून काढला आहे. व जनतेतून स्वागतही झाले आहे. ‘थेट सामान्य मतदार भेट’ ही संकल्पना गडाख यांनी राबवली आहे. विविध गावात सभामंडप देऊन त्यांनी आघाडी घेतली आहे.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे गेले 7 दिवसापासून मुंबईत उमेदवारीसाठी ठाण मांडून बसले होते. पक्षाच्या सर्व नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या असल्याची चर्चा तालुक्यात आहे. अजितदादा पवार यांच्या भेटीनंतर बाळासाहेब मुरकुटे हे भाजप सोडणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मुरकुटे यांनी रविवारी नेवासा येथे कार्यकर्ता मेळावा ठेवला आहे. यात ते काय भूमिका मांडतात ते पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे. जर त्याना उमेदवारी मिळाली नाही तर ते काय करणार? जर विधानसभा लढवली नाही तर आगामी तालुक्याच्या राजकारणात त्यांचे स्थान काय असणार अशा विविध चर्चा नेवासा तालुक्यात घडत आहेत.

नेवाशाची जागा ही शिंदे सेनेला सोडू नये कारण तेथे नवखा उमेदवार असून त्यांना तालुक्यातील प्रश्नांची माहिती नाही, गावाची माहिती नाही त्यामुळे भाजप सोडून शिंदे सेनेत मी प्रवेश करतो. मला उमेदवारी द्या असा प्रस्ताव एका भाजपच्या मोठ्या नेत्याने शिंदे सेनेकडे ठेवला असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या