भेंडा (वार्ताहर)
- Advertisement -
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासा-शेवगाव राज्यमहामार्गावर व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर ऊस वाहतूक करणारा डबल ट्रेलरचा ट्रॅक्टर-स्कार्पिओ-स्कुटी अशा तीन वाहनांच्या अपघातात स्कुटीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३ वर्षे) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना आज (दि २२) रात्री ८.३० वाजेचे सुमारास घडली.
मयत अमित हा प्रसिद्ध वकील ऍड. काॅ. बन्सी सातपुते व सामाजिक कार्यकर्त्या काॅ.स्मिता पानसरे यांचा एकुलता एक मुलगा आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आला आहे. अमित याच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…)