Sunday, September 8, 2024
Homeनगरनेवासा शहरात बंद घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी

नेवासा शहरात बंद घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन सुमारे चार तोळे सोन्यासह (Gold) 100 ग्रॅम चांदीच्या (Silver) वस्तू व रोख 25 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना नेवासा (Newasa) शहरात घडली असून याबाबत दखल फिर्यादीरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोयाबीन पिकांवर मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव

याबाबत प्रभा प्रकाश मोदी (वय 48 धंदा-मजुरी. रा. नेवासा खुर्द) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी व माझा मुलगा स्वप्नील असे आमचे नातेवाईकांना भेटणेकरीता सकाळी 9 वाजण्याचे सुमारास आमचे राहते घराला कुलुप लावून जळगाव ता.जि. जळगाव येथे गेलो होतो. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 च्या सुमारास माझा भाचा ओंकार माणीक मापारी. याने फोन करुन सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. तेव्हा मी त्याला घरामधे जाउन खात्री करणेस सांगीतले असता त्याने मला सांगीतले की, घरातील सामानाची उचका पाचक झालेली असून सर्व वस्तु अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत आहेत. तेव्हा आमचे घरी चोरी (Theft) झाल्याचे आमचे लक्षात आले. त्यानंतर मी व माझा मुलगा स्वप्नील असे आम्ही जळगावहुन (Jalgav) नेवासा येथे आमचे घरी येउन पाहीले असता आमचे घराचे दरवाजाचे कडी-कोयंडा तुटलेला दिसला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मी व मुलगा स्वप्नील असे आम्ही घरात जाउन पाहीले असता माझे खालील वर्णनाचे व किंमतीचे दागीने (Jewelry) व रोख रक्कम चोरीस (Theft) गेल्याचे दिसून आले.

चोरीस (Theft) गेलेले दागिने (Jewelry) व रोख रक्कम पुढीलप्रमाणे- 9 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे (10 ग्रॅम) एक सोन्याचे लॉकेट, 8 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, 6 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या, दोन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नथी, दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे 25 मणी, अडीच ग्रॅम वजनाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या, दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्यांच दोन जोड, 100 ग्रॅम (दहा भार) वजनाच्या चांदीच्या (Silver) वस्तू, 25 हजार रुपयांची रोख रक्कम असे एकूण 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments), 100 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व 25 हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) भारतीय दंड विधान कलम 454, 457, 380 प्रमाणे घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या