Thursday, January 8, 2026
HomeनगरBus Fire : अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात...

Bus Fire : अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

नेवासा | तालुका प्रतिनिधी

अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना आज (बुधवार) पहाटे ५ च्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील १५ प्रवासी बचावले आहेत. परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून जामोदकडे निघालेल्या खासगी बसला (क्र. HM-19-Y-3123)नेवासा तालुक्यातील खडका टोल नाका येथे आग लागली. प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे.

YouTube video player

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचेसह पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. बसमधील सर्व प्रवासी खाली उतरवले आहे. वाहतूक सुरळीत चालू केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. तसेच भेंडा येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

(सविस्तर वृत्त लवकरच)

ताज्या बातम्या

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ....