Saturday, July 11, 2026
Homeक्राईमNewasa : नेवासा बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी जेरबंद

Newasa : नेवासा बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी जेरबंद

13 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत || स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा बसस्थानक, बसस्थानक परिसर आणि प्रवासादरम्यान चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या कारवाईत 13 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अर्चना अंबादास थोरात (वय 46, रा. सदगुरुनगर नं. 02, जेलरोड, नाशिक रोड, नाशिक) व त्यांची बहीण या नेवासा फाटा येथून नेवासा येथे ऑटोरिक्षामधून येत होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळील दोन महिलांनी त्यांच्या सामानाच्या बॅगमधील पर्स व त्यामधील 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले आहे. सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, अतुल लोटके, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भगवान थोरात, सुनील मालणकर, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, वंदना मोढवे, चिमा काळे, ज्योती शिंदे, सुवर्णा गोडसे, चालक महादेव भांड, उमाकांत गावडे, अर्जुन बडे तसेच महिला पोलीस अंमलदार छाया माळी, प्रभावती कोकाटे, कल्याणी आव्हाड आणि सीसीटीव्ही कक्ष यांचे पथक तयार करण्यात आले.

सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना करून पथक रवाना करण्यात आले. पथक सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा भाग्यश्री भोसले (रा. घोटण, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हिने तिच्या साथीदारांसह केला असून ती नेवासा फाटा येथे आहे. त्यानंतर पथकाने तात्काळ नेवासा फाटा येथे जाऊन सापळा रचून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांना त्यांचे नाव व गाव विचारले असता, त्यांनी भाग्यश्री सुनील भोसले उर्फ भाग्यश्री जगदीश काळे (वय 23, रा. घोटण, ता. शेवगाव), नगिना सतीश भोसले (वय 22, रा. शिरूर कासार, जि. बीड, हल्ली रा. पाथर्डी रोड, शेवगाव), सुरेखा राऊत चव्हाण (वय 19, रा. टाकरवण, ता. माजलगाव, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. वरील महिला आरोपींकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा आम्ही तिघींनी मिळून केला असल्याची कबुली दिली.

आरोपींच्या सांगण्याप्रमाणे 90 ग्रॅम वजनाचे 7 सोन्याचे लगड असा एकूण 13 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी नेवासा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून, पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

कसारा

Igatpuri News: चार महिन्यांपूर्वीच दुरुस्ती, तरी कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली!...

0
इगतपुरी | प्रतिनिधीमागील आठवड्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप...