Saturday, July 27, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यातील 17 गावांत 34 संक्रमित

नेवासा तालुक्यातील 17 गावांत 34 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 18 गावांतून काल 34 करोना संक्रमित आढळून आले असून त्यामुळे तालुक्यातील

- Advertisement -

एकूण करोना संक्रमितांची संख्या 1712 झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

काल सोनई येथे सर्वाधिक 10 संक्रमित आढळून आले. नेवासा खुर्द व शिरसगाव येथील प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले.

चांदा, खरवंडी, मुकिंदपूर व सुरेगाव दही या चार गावांतील प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

भानसहिवरा, करजगाव, कुकाणा, लोहगाव, नेवासा बुद्रुक, निपाणी निमगाव, पानेगाव, प्रवरासंगम, तेलकुडगाव व झापवाडी या 10 गावांतून प्रत्येकी एकाला करोना संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले.

अशाप्रकारे एकूण 17 गावांतून 34 जणांचे करोना चाचणी अहवाल काल संक्रमित आल्याने तालुक्यातील करोना संक्रमितांची एकूण संख्या 1712 झाली आहे.

सोनई पोलिसांच्या ताब्यातील तिघे आरोपी संक्रमित

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींपैकी तिघे करोना संक्रमित असल्याचे रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीतून स्पष्ट झाले.

याबाबत माहिती अशी की, सदर आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती. कोठडीची मुदत संपल्यावर आरोपींची कोव्हिड बाबत नेवासा येथे अ‍ॅन्टीजेन रॅपीड टेस्ट केली असता आरोपींपैकी तिघे करोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. या तिघा आरोपींना अहमदनगर कोव्हिड सेंटरला रवाना करण्यात आल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या