नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील 17 गावांतून काल दुपारपर्यंत 34 जणांच्या चाचण्या करोना संक्रमित आढळून
- Advertisement -
आल्या असून त्यामुळे तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 1974 झाली आहे.
नेवासा तालुक्यातील छोट्याशा मक्तापूर गावात 6 संक्रमित आढळून आले आहेत. सोनई येथे चौघे संक्रमित आढळले.
बेलपांढरी, तेलकुडगाव व झापवाडी या तीन गावांत प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले. चांदा व शिंगवेतुकाई येथे प्रत्येकी दोघांना करोना संक्रमण झाल्याचे चाचणीतून दिसून आले.
गणेशवाडी, घोडेगाव, गोगलगाव, जेऊरहैबती, कांगोणी, खरवंडी, कुकाणा, रस्तापूर, उस्थळदुमाला व वाकडी या 10 गावांतून प्रत्येकी एकाला करोना संक्रमण झाले. अशाप्रकारे तालुक्यात काल एकूण 34 जण चाचण्यांमध्ये संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 1974 झाली आहे.