Tuesday, March 25, 2025
Homeनगरधक्कादायक! अज्ञात व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

धक्कादायक! अज्ञात व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

पाचेगाव । वार्ताहर

नेवासा (Newasa) तालुक्यातील पाचेगाव (Pachegoan) येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आज शुक्रवार रोजी सकाळी दाहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांनी पाचेगाव ते पाचेगाव फाटा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा खून झालेल्या अवस्थेत पाहिला. त्यानंतर याची सर्व गावात चर्चा होऊन घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याचे निष्पन्न झाले.

हे हि वाचा : ‘मविआ’त मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

घटनास्थळी नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,उपनिरीक्षक विजय बोभे, मनोज आहेर,विकास पाटील व पोलीस नाईक ढमाळे यांनी येऊन अज्ञात व्यक्तीच्या प्रेताची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला.तसेच पुढील पंचनामा करण्यासाठी नेवासा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पाठविण्यात आला आहे .

हे हि वाचा : विदर्भात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ हाती

खून झालेल्या अज्ञात व्यक्तीचे वय ३५ वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तसेच अंगावर टी शर्ट, जीन्स पॅन्ट व उजव्या हातावर महाकाल देवाचा फोटो गोदलेले आहे. त्यामुळे खून झालेला व्यक्ती कोण व खून कोणी व कश्यासाठी के? हे पोलिसांसमोर आव्हान आहे.

हे हि वाचा : आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...