Thursday, March 27, 2025
Homeनगरनेवाशात गडाख ठरवतील तोच होणार सभापती

नेवाशात गडाख ठरवतील तोच होणार सभापती

खुल्या प्रवर्गासाठी राखीव पदामुळे सर्वांच्याच आशा पल्लवीत

नेवासा (का. प्रतिनिधी) – पंचायत समित्यांच्या उर्वरीत अडीच वर्षांच्या कालखंडाकरिता सभापती पदासाठी काढलेल्या आरक्षण सोडतीत नेवासा पंचायत समिती खुल्या वर्गासाठी घोषित झाली आहे. खुल्या जागेमुळे सर्वच सदस्य सभापती पदासाठी पात्र ठरत असले तरी मूळ खुल्या गटातून निवडून गेलेल्यांनाच हे पद देण्याचा विचार झाला तर या वर्गातून निवडून गेलेल्या क्रांतिकारीच्या तिघा सदस्यांपैकी एकाला प्राधान्य दिले जाऊ शकते.

- Advertisement -

नेवासा पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. फेब्रुवारी 2017 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 5 जागा व पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागांवर आ. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी शेतकरी पक्षाने विजय मिळवून मोठे यश मिळवले होते. त्यामुळे या गटाचे पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व आहे.

पंचायत समितीच्या खुल्या प्रवर्गासाठी चार सदस्यांच्या जागा होत्या. त्यामध्ये क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून बेलपिंपळगाव गणातून रवींद्र शेरकर, भानसहिवरा गणातून किशोर जोजार, मुकिंदपूर गणातून रावसाहेब सोन्याबापू कांगुणे हे तिघे तर भाजपाकडून भेंडा बुद्रुक गणातून अजित मारुती मुरकुटे हे विजयी झाले होते.

मात्र 12 सदस्यांसह क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. जर या गटातून विजयी झालेल्या सदस्याचा विचार केला तर क्रांतिकारीच्या या तिघांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले तीनही उमेदवार गडाख यांचे एकनिष्ठ मानले जाणारे आहेत. मात्र सभापतीपद खुले झाल्याने कोणताही सदस्य या पदावर दावा करू शकतो शिवाय पंचायत समितीत जवळपास एकतर्फी स्थिती असल्याने गडाख जाहीर करतील तो उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी सोनई गणाच्या सदस्य सुनीता गडाख यांनी सभापती पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संधी मिळालेल्या खरवंडी गणाच्या कल्पना पंडित विद्यमान सभापती आहेत. आता अडीच वर्षासाठी सभापतिपद कोणाला मिळते याबाबत उत्सुकता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

काय केल्यास कलह-आजार नाहीसे होतात ?

0
वास्तुशास्त्रानुसार घर बांधणे हे एक शास्त्र आहे. यात घराची दिशा आणि विविध गोष्टींचे स्थान यांचेही शास्त्र आहे, ज्याचा अध्यात्म आणि ग्रहांशी खोलवर संबंध आहे....