Sunday, April 13, 2025
Homeनगरनेवाशात शासकीय कामात अडथळ्यासह विविध गुन्हे दाखल

नेवाशात शासकीय कामात अडथळ्यासह विविध गुन्हे दाखल

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा बसस्थानकासमोरील हॉटेलात विक्रीसाठी ठेवलेला बेकायदेशीर दारुसाठा परीविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक यांनी छापा टाकून पकडला असता संबंधीत इसमाने सरकारी कामात अडथळा आणून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस हवालदार अजय कारभारी साठे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली तसेच नेवासा पोलीस ठाण्याच्यावतीने प्रसार माध्यमांसाठी प्रसिद्धीपत्रक देण्यात आले. फिर्यादीत म्हटले की, दि.9 एप्रिल रोजी सायंकाळी 6:20 वाजेचे सुमारास परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी मला व पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, जालींदर दहिफळे, चालक कॉन्स्टेबल श्री. भवार असे आम्हाला त्यांचे कॅबीनमध्ये बोलावुन घेवून समक्ष कळविले की, बस स्टॅन्ड समोर हॉटेल जय भवानी येथे कैलास पोपट जिरे हा बेकायदेशीर दारुची विक्री करत असून त्या ठिकाणी कायदेशीर कार्यवाही करण्यास सांगीतले. त्यामुळे आम्ही शासकीय वाहन (एमएच 16 डीजी 5998) घेवून 6:30 वाजता हॉटेल जयभवानीची पाहणी करत असताना हॉटेलचे पाठीमागील बाजूस देशी-विदेशी दारुच्या बाटल्याचा बॉक्स दिसून आला.

हॉटेल मालक कैलास उर्फ बाळू पोपट जिरे हा पाठीमागून धावत येवून त्याने धक्काबुक्की करुन तुम्ही या बाटल्या घेवून जावू नका, माझेवर केस करु नका असे म्हणून मोठमोठ्याने आरडा-ओरड करुन तुम्ही जर माझेवर केस केली तर मी आत्महत्या करील, अशी धमकी दिली. त्यामुळे त्याला पंचासमक्ष मुद्देमालासह पोलीस ठाण्यात नेवून त्याच्यावर बेकायदेशीर दारुसाठा व शासकीय कामात अडथळा तसेच आत्महत्येची धमकी या प्रचलित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्याकडून 6 हजार 40 रुपये किमतीचा देशी-विदेशी बेकायदेशीर दारुसाठा पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, उपअधिक्षक संतोष खाडे, उपनिरीक्षक विकास पाटील, हवादार श्री. साठे, कॉन्स्टेबल श्री. गवळी, दहिफळे, श्री. भवर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. अहिरे करत आहेत. दरम्यान यापुढेही अशाप्रकारे बेकायदेशीर दारु साठा/विक्री करणार्‍या इसमांवर व अवैध व्यवसाय करणारे तसेच पोलीस कारवाईमध्ये अडथळा आणणार्‍या इसमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे परीविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकशाहीला जनताच वाचवेल – खा. अरविंद सावंत

0
नाशिक। प्रतिनिधी Nashik आज संविधान धोक्यात आले असून, भारताची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीचे स्तंभ आणि निवडणूक आयोग ही सर्वच केंद्राने एक प्रकारे आपल्या ताब्यात...