Saturday, May 18, 2024
Homeनगरपिण्याच्या पाण्यासाठी नेवासकरांचा 'जन आक्रोश'

पिण्याच्या पाण्यासाठी नेवासकरांचा ‘जन आक्रोश’

नेवासा । तालुका वार्ताहर

नेवासा शहरात होत असलेल्या अस्वछ पाणी पुरवठा तसेच विविध मागण्यासाठी ग्रामस्थ व शंकरराव गडाख मित्र मंडळ नेवासा शहर यांच्या वतीने तहसीलदार व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी याना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांचा मोठा जनक्रोश दिसून आला. सरकार व माजी आमदार यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. गळ्यात खराब पाण्याच्या बाटल्या लटकवून अनेक तरुण यावेळी उपस्थित होते. हा प्रश्न मार्गी नाही लागला तर पुढील काळात तीव्र आंदोलनं करण्याचा इशारा देण्यात आला .

- Advertisement -

तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

नेवासा शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही. जर पाणी आले तर अस्वच्छ येते, पाणी योजनेचे काम थांबले आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न अशा विविध समस्याचा मुकाबला नेवासा ग्रामस्थ करत आहे .नगरपंचायतचा कार्यकाळ संपल्याने राज्य शासन नियुक्त प्रशासक तहसिलदार व मुख्याधिकारी कारभार पाहत आहे. अस्वच्छ पाणी येत असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे, दवाखाने भरले आहे. नेवासा शहराच्या पाणी योजनेसाठी आ गडाख यांनी मोठे प्रयत्न केले  परंतु सरकार बदलण्याने पाणी योजनेचे काम थांबले आहे. गडाख याना श्रेय मिळू नये यासाठी माजी लोकप्रतिनिधी  ही पाणी योजना रखडवली आहे असाही आरोप उपस्थितांनी केला. 

धार्मिक कार्यक्रमावरून दोन समाजात तणाव; गावात मोठा पोलिस बंदोबस्त

- Advertisment -

ताज्या बातम्या