Friday, July 24, 2026
Homeनगरनेवासा नगरपंचायत : 33 हरकतींवर प्रांताधिकार्‍यांसमोर झाली सुनावणी

नेवासा नगरपंचायत : 33 हरकतींवर प्रांताधिकार्‍यांसमोर झाली सुनावणी

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा नगरपंचायतीच्या 18 ऑगस्ट रोजी जाहिर झालेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर आलेल्या 33 हरकतींवर गुरुवार दि. 28 ऑगस्ट रोजी नेवासा तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी सुधीर पाटील व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. 25 हरकतदार यावेळी सुनावणीस उपस्थित होते.

- Advertisement -

प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या समोर 25 हरकतीदारांनी हजेरी लावून या सुनावणी दरम्यान जाहिर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला. यापैकी 7 हरकतदारांची अ‍ॅड. अशोक करडक, अ‍ॅड. मनोज हारदे यांनी नेवासा नगरपंचायत ने प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध केलेली वॉर्ड रचनेवर कायदेशीर बाजू मांडताना सांगितले की प्रारूप वॉर्ड रचना भौगोलिक दृष्ट्या संलग्नता नसलेली आहे. तसेच लोकसंख्येनुसार प्रत्येक वॉर्डाची संख्या कमी अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे लोकसंख्या व भौगोलिक संलग्नतेचा कुठेही ताळमेळ नसल्यामुळे. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक राहील.

सुनावणी दरम्यान नविन प्रभाग रचना भौगोलिक दृष्ट्या चुकीची झाली असून यामध्ये पूर्वीच्या प्रभागाचे भाग वेगवेगळ्या प्रभागांना जोडले आहेत यामुळे नवीन प्रभाग रचना भौगोलिक दृष्ट्या अयोग्य असुन यामुळे प्रत्येक प्रभागात लोकसंख्येचे प्रमाण कमी, अधिक झाले आहे. या भौगोलिक दृष्ट्या चुकीच्या प्रभाग रचनेमुळे मतदानाची घट देखील होईल. 2017 ची प्रभागरचना भौगोलिक दृष्या योग्य असून तीच ठेवण्यात यावी सुनावणी दरम्यान प्रांताधिकार्‍यांसमोर हरकतदारांनी असे म्हणणे मांडले.

प्रांताधिकारी पाटील यांनी स्वतंत्रपणे म्हणने ऐकून घेत प्रत्येकांच्या हरकती आक्षेपांवर तक्रारदारांचे म्हणणे नोंदविण्यात आले. त्यामुळे झालेली ही सुनावणी तहसिल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सज्जू बागवान, गफुर बागवान, हमीद बागवान, शारुख बागवान, सलमान बागवान, नवाब बागवान, अ‍ॅड. संजय सुखधान, सचिन नागपुरे, भारत डोकडे, कृष्णा ज्ञानदेव डहाळे, राजेंद्र मापारी, राजेंद्र पोतदार, बंडू शिंदे, महेश लोखंडे, भाऊसाहेब वाघ, अमित मापारी, सुनिल वाघ, संतोष चांदणे, राजेंद्र मुथ्था, नितीन मिरपगार, गणेश गाढवे, रोहित कोकाटे, अशोक ताके, सतीश गायके, रुपेश उपाध्ये, सचिन नागपुरे हे हरकतदार उपस्थित होते.

नगरपंचायत प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली यावेळी हरकतदारांनी त्यांचे आक्षेप नोंदवीले. सुनावणीचा अभिप्राय वरीष्ठांना देणार आहोत.

– सुधीर पाटील, प्रांताधिकारी

ताज्या बातम्या

पावसाचा

Nashik Rain News: जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा जोर कायम; आज ऑरेंज...

0
नाशिक । प्रतिनिधीजिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला असून, शुक्रवारी (दि.24) घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कायम...