Wednesday, February 4, 2026
HomeनगरNewasa : नेवासा नगरपंचायत प्रारुप प्रभागरचनेवर 33 हरकती

Newasa : नेवासा नगरपंचायत प्रारुप प्रभागरचनेवर 33 हरकती

एक कुटुंब दोन वेगळ्या प्रभागात विभागले न जाण्याची काळजी घेतली नाही || भौगोलिकदृष्ट्या चुकीच्या प्रभागरचनेचा दावा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा नगरपंचायतच्या सन 2025 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी दि. 18 ऑगस्ट रोजी कार्यक्रम जाहीर केला करण्यात आला होता या प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी 33 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. नोंदवलेल्या हरकतीमध्ये शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा कुठलाही विचार न करता चुकीची प्रभाग रचना निर्माण केले असल्याचे म्हटले आहे. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रूळ, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. असे स्पष्ट निर्देश दिलेले असताना देखील मा. मुख्याधिकारी यांनी नेवासा नगरपंचायत ची प्रभाग रचना करताना कुठल्याही भौगोलिक मर्यादेचा विचार केलेला नाही.

- Advertisement -

केवळ प्रभाग क्रमांक एक, दोन, चार मध्ये नाममात्र बदल करून उर्वरित प्रभाग रचना गैरसोयीची केली आहे.शासनाच्या वार्ड मतदार संख्या मर्यादा 1200 ते 1400 याचाच विचार केला,शहराची भौगोलिक रचना लोकसंख्येचे प्रमाण, शहर रचना याचा कोणताही विचार केला नाही निवडणुकीसाठी पूर्वीच्या रचनेत बदल करताना प्रगणक गट फोडताना एक कुटुंब दोन वेगळ्या प्रभागात विभागले जाणार नाही याची काळजी घेतली नाही.

YouTube video player

महाराष्ट्र नगर परिषद ,नगरपंचायत व नागरी अधिनियम 1995 चे कलम 10(5) नुसार वार्ड हद्दीची पुन्हा आखणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दर्जा बदललेला नाही व हद्दीमध्ये बदल झालेला नाही या बाबींचा विचार केला नाही.
प्रभाग रचना करताना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वांचा चुकीचा अर्थ लावून फक्त प्रगणक गट फोडू नये किंवा फोडता येत नाही याच एका मुद्द्यावर भर दिला असून नेवासा येथील भौगोलिक परिस्थितीचा कुठलाही विचार न करता प्रभागाची चुकीची रचना केलेली आहे. परंतु विशेषता कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सदर शासनाच्या आदेशामध्ये सांगितले आहे. परंतु याचे पालन सदर प्रभाग रचना करताना झाल्याचे आढळून येत नाही.

मुख्याधिकारी यांनी केलेली चुकीची प्रभाग रचना आहे अशीच राहिली तर, नेवासाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता प्रभागाचे रस्ते वीजपुरवठा गटारी, तसेच अन्य नागरी सुविधांचे काम नेवासा नगरपंचायत मार्फत करणे शक्य होणार नाही. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या विसंगत झालेली प्रारूप प्रभाग रचना भौगोलिक दृष्ट्या विचार करून तयार करणे आवश्यक आहे.
नेवासा नगरपंचायतिची 2016-17 मध्ये तयार करण्यात आलेली. प्रभाग रचना नेवासा शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आली होती. आणि मागील 7वर्षात त्याप्रमाणे नागरिक सुविधा देणे भौगोल दृष्ट्या सोयीचे ठरलेले आहे. त्यामुळे 2016 /17 प्रमाणे प्रभाग रचना असणे नैसर्गिक न्यायाचे ठरेल.

प्रभाग रचना करण्याची कार्यपद्धती नुसार कलम 5.6 अन्वये सदर प्रभागाच्या रचनेमध्ये प्रगणक गट फोडावयाचे असल्यास जिल्हाधिकार्‍यामार्फत राज्य निवडणूक आयोगाची अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍याची मान्यता. घेऊन तेथील भौगोलिक परिस्थिती वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगणे आवश्यक होते ते मुख्याधिकार्‍यांनी पालन केलेले नाही. सदर भौगोलिक परिस्थितीमध्ये प्रगणकगट फोडून प्रभागाची रचना करणे आवश्यक. या गोष्टीची कल्पना मुख्याधिकारी यांनी न देता मनमानी पद्धतीने केवळ प्रगणक गट फोडता येत नाही याच एका मुद्द्द्यावर भर देऊन भौगोलिकदृष्ट्या चुकीची प्रभागरचना केली आहे. नेवासा शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नागरिकांना सोयीस्कर अशी प्रभाग रचना करण्यात यावी असेही हरकतीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...